औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३५ टक्केच फळबागांची लागवड

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात लक्षांकाच्या सरासरी ३५ टक्‍केच फळबाग लागवड झाली आहे.
In Aurangabad, Jalna and Beed districts, only 35% of the target orchards have been planted
In Aurangabad, Jalna and Beed districts, only 35% of the target orchards have been planted

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात लक्षांकाच्या सरासरी ३५ टक्‍केच फळबाग लागवड झाली आहे. महात्मा गांधी राष्र्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत ही लागवड झाली. तर यंदा ४५८० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या योजनेअंतर्गत २०१७-१८ ते २०१९-२० दरम्यान तीनही जिल्ह्यात २८२१ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ७७० हेक्‍टर, जालना १५३० हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ५२० हेक्‍टर फळबागांचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये ४१० हेक्‍टर, २०१७-१८ मध्ये ६९५ हेक्‍टर, २०१८-१९ मध्ये ८२४ हेक्‍टर, तर २०१९-२० मध्ये ८९० हेक्‍टरवर फळपिकांची लागवड झाली. 

२०२०-२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३१६८ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक होता. त्या तुलनेत केवळ २० टक्‍के अर्थात ६३० हेक्‍टरवरच लागवड झाली. बीड जिल्ह्यात ४५९० हेक्‍टरवर फळबाग लागवड लक्षांकाच्या तुलनेत केवळ ५ टक्‍के अर्थात २२३ हेक्‍टरवर लागवड झाली होती. या दोन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याने मात्र आघाडी घेतली होती. जालन्यात २५३० हेक्‍टरवर लक्षांकाच्या तुलनेत १०८ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २७३७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती. 

यंदाच्या (२०२१-२२) हंगामात तीनही जिल्ह्यासाठी ४५८० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी १७९० हेक्‍टर, जालना १२६० हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यासाठी १५३० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे, असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com