औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याची ५९ हजार हेक्‍टरवर पेरणी

 Aurangabad, Jalna, Beed Districts sow over 59 thousand hectares.
Aurangabad, Jalna, Beed Districts sow over 59 thousand hectares.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील हरभऱ्याच्या सर्वसाधारण १ लाख ५९ हजार ७१० हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ५९ हजार ९८ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हरभरा पेरणीत आघाडीवर आहे. 

गतवर्षी दुष्काळ अन् यंदा अवेळी व अतिवृष्टीने खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास गेला. सतत दोन वेळा पीक हातचे गेलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता रब्बीवरच अवलंबून आहेत. गत आठवड्याअखेरच्या रब्बी पेरणी अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यात हरभऱ्याच्या सर्वसाधारण ४५ हजार ९०२ हेक्‍टरच्या तुलनेत ८१४७ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यातील १ हजार ३४ हेक्‍टर, पैठण १६०० हेक्‍टर, फुलंब्री ४१९ हेक्‍टर, वैजापूर १२६० हेक्‍टर, गंगापूर ८२९ हेक्‍टर, खुल्ताबाद १३९० हेक्‍टर, सिल्लोड ३८० हेक्‍टर, कन्नड ११८५ हेक्‍टर, तर सोयगाव तालुक्‍यातील ५० हेक्‍टर हरभरा क्षेत्राचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यात सर्वसाधारण ४२ हजार ५१८ हेक्‍टरच्या तुलनेत १५ हजार ६२४ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. त्यामध्ये जालना तालुक्‍यातील ३७० हेक्‍टर, भोकरदन १२२३ हेक्‍टर, जाफ्राबाद ३७०७ हेक्‍टर, बदनापूर १४३८ हेक्‍टर, परतूर १८५७ हेक्‍टर, अंबड १०९१ हेक्‍टर, घनसावंगी २४१८ हेक्‍टर, तर मंठा तालुक्‍यातील ३५२० हेक्‍टरचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात यंदा हरभऱ्याच्या सर्वसाधारण ७१ हजार २९० हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ३५ हजार ३२७ हेक्‍टरवर पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक ९४६९ हेक्‍टर क्षेत्रावर आष्टी तालुक्‍यात हरभऱ्याची पेरणी झाली. त्यापाठोपाठ अंबाजोगाई तालुक्‍यात ७३६६ हेक्‍टरवर, बीड २४६६ हेक्‍टर, पाटोदा १३२५ हेक्‍टर, शिरूर १९०९ हेक्‍टर, माजलगाव २१७० हेक्‍टर, गेवराई ८७२ हेक्‍टर, धारूर १७३६ हेक्‍टर, केज ७३०७ हेक्‍टरवर, तर परळी तालुक्‍यात ७०७ हेक्‍टरवरील हरभरा पिकाचा समावेश आहे. 

पेरणीचा कालावधी ओलांडला

मराठवाड्यात यंदा पावसाने खरिपाचा घात केला. सोबतच जास्त पावसामुळे जमिनीत वापसाच नसल्याने रब्बीसाठी जमीन तयार करण्यासाठी वेळ लागतो आहे. त्यामुळे बहुतांश पिकांचा पेरणीचा निर्धारित कालावधी ओलांडून गेला आहे. गहू, मोहरी, सूर्यफूल याच पिकांच्या पेरणीचा कालावधी हातात आहे. ज्वारी, हरभरा, करडई, तीळ, जवस आदी पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. शेतकरी मात्र कालावधी ओलांडल्यानंतरही जसजशी जमीन तयार होईल, तशी पेरणी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com