औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी, मक्याची हेक्टरी उत्पादकता निश्‍चित

औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी, मक्याची हेक्टरी उत्पादकता निश्‍चित
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी, मक्याची हेक्टरी उत्पादकता निश्‍चित

औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत कृषी विभागाकडून ज्वारीची हेक्‍टरी १० क्‍विंटल ८३ किलो, तर मक्याची ३८ क्‍विंटल ७७ किलो उत्पादकता नियोजित करण्यात आली आहे. त्यासाठी मागील चार वर्षांतील उत्पादकतेच्या आकड्यांचा संदर्भ कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात १० लाख २ हजार हेक्‍टरवर रब्बीचे क्षेत्र नियोजित आहे. त्यामध्ये ४ लाख १५ हजार हेक्‍टरवर ज्वारी, १ लाख ५९ हजार हेक्‍टरवर गहू, २ लाख ९३ हजार हेक्‍टरवर हरभरा, केवळ १५ हजार हेक्‍टरवर करडई, १ लाख १४ हजार  हेक्‍टरवर मका, तर ७ हजार हेक्‍टरवर इतर पिकांची पेरणी नियोजित करण्यात आली आहे. 

या तीनही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ६ क्‍विंटल १ किलो राहिली आहे. गव्हाची हेक्‍टरी १३ क्‍विंटल १५ किलो, मक्याची १९ क्‍विंटल ३८ किलो, तर हरभऱ्याची ६ क्‍विंटल ६० किलो राहिल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्या तुलनेत यंदा रब्बी ज्वारीची हेक्‍टरी १० क्‍विंटल ८३ किलो, गव्हाची हेक्‍टरी २४ क्‍विंटल ८७ किलो, मक्याची ३८ क्‍विंटल ७७ किलो, तर हरभऱ्याची १२ क्‍विंटल ९५ किलो हेक्‍टरी उत्पादकता नियोजित आहे. 

मागील चार वर्षांत ज्वारी, मका, गहू, हरभरा, या प्रमुख रब्बी पिकांची उत्पादकता गाठणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे यंदा आधी पावसाचा लहरीपणा, आता परतीच्या पावसाची स्थिती पाहता नियोजित क्षेत्र व उत्पादकतेचा आकडा यंदाच्या रब्बीत गाठता येईल का, हा प्रश्‍न आहे.

मागील चार वर्षांतील पीकनिहाय उत्पादकता (किलोग्रॅम/हेक्‍टरी)

पीक  २०१५-१६ १६-१७ १७-१८ १८-१९
ज्वारी २८७  ९४२ ६६४ ३२२
गहू ६८७  २१६३ १५३६  ९०१
मका ९७३  ३३७१ २०६८ १०५२
हरभरा २६८ ११२६ ८१०  ४२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com