ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-अधिक जोर
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यात पाऊस पुन्हा जोर धरतो आहे. परंतु, हा जोर सार्वत्रिक नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांच्या उत्तर पश्चिम व काही ठिकाणी मध्य भागात पावसाचा जोर जास्त दिसतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ मंडळांत पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४० मंडळांत हजेरी लावली, तर मंठा तालुक्यासह परतूर तालुक्यातील बहुतांश मंडळांकडे पाठ फिरविली.
परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, तालुक्यातील मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली. याशिवाय एकूण ८० पैकी केवळ ३० मंडळांत तुरळक ते हलकी हजेरी लावली. बीड जिल्ह्यात ६३ पैकी ५४ मंडळांत पाऊस झाला. परळी, धारूर, केज, शिरूर कासार, अंबाजोगाई, पाटोदा, तालुक्ंयातील कमी पाऊस वगळता इतर तालुक्यांतील मंडळांमधील पावसाची हजेरी समाधानकारक राहिली.
लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४७ मंडळांत पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील छोट्या नद्यांना बुधवारी (ता. १८) व गुरुवारी सकाळच्या सुमारास पूर आले. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी गुरुवारी दुपारी पाऊस सुरू होता.
जिल्हानिहाय पावसाची मंडळे (३० मिमी पुढील)
औरंगाबाद जिल्हा | आडूळ ७, विहामांडवा ७३, अमठाणा ९५, चिकलठाणा ६८, चिंचोली ६५, पाचोड ६३, नांदर ३८, अजिंठा ६२, अंबाई ३६, भराडी ४०, गोळेगाव ३०, बोरगाव अर्ज ४५, कन्नड ५६, पिशोर ३५, करंजखेडा ३४, नाचनवेल ४९ |
जालना जिल्हा | धावडा १४७, अनवा ७०, वडीगोद्री १२४, भोकरदन ३७, सिपोरा बाजार ४२, पिंपळगाव रेणूकाई ६०, हसनाबाद ४०, आष्टी ३२, जामखेड ३२, गोंदी ३५, रोहीलागड ३४, सुखापूरी ३६, रांजणी ३०, कुंभार पिंपळगाव ५६ |
परभणी जिल्हा | गंगाखेड ४०, महातपुरी ४०, |
बीड जिल्हा | बीड ३०, जातेगाव ३०, तलवाडा ४५, माजलगाव ३५ |
लातूर जिल्हा | मदनसुरी ९१, औसा ३९, किल्लारी ३६, कासार शिरसी ४४, औराद श. ४९, कासारबालकुंदा ५५, बोरोळ ३४ |
नांदेड जिल्हा | देगलूर ३२ |
उस्मानाबाद जिल्हा | ढोकी ३३, पाडोळी ५०, नळदुर्ग ५१, सालगरा ४६, मुळज ४०, डाळिंब ५८, मोहा ३९. |
- 1 of 1026
- ››