Agriculture news in marathi, Aurangabad, Jalna districts receive heavy rainfall | Page 2 ||| Agrowon

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-अधिक जोर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यात पाऊस पुन्हा जोर धरतो आहे. परंतु, हा जोर सार्वत्रिक नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांच्या उत्तर पश्‍चिम व काही ठिकाणी मध्य भागात पावसाचा जोर जास्त दिसतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ मंडळांत पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्‍यांत पावसाचा जोर राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४० मंडळांत हजेरी लावली, तर मंठा तालुक्‍यासह परतूर तालुक्‍यातील बहुतांश मंडळांकडे पाठ फिरविली. 

परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, तालुक्‍यातील मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली. याशिवाय एकूण ८० पैकी केवळ ३० मंडळांत तुरळक ते हलकी हजेरी लावली. बीड जिल्ह्यात ६३ पैकी ५४ मंडळांत पाऊस झाला. परळी, धारूर, केज, शिरूर कासार, अंबाजोगाई, पाटोदा, तालुक्ं‍यातील कमी पाऊस वगळता इतर तालुक्‍यांतील मंडळांमधील पावसाची हजेरी समाधानकारक राहिली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४७ मंडळांत पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील छोट्या नद्यांना बुधवारी (ता. १८) व गुरुवारी सकाळच्या सुमारास पूर आले. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी गुरुवारी दुपारी पाऊस सुरू होता. 

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (३० मिमी पुढील)

औरंगाबाद जिल्हा आडूळ ७, विहामांडवा ७३, अमठाणा ९५, चिकलठाणा ६८, चिंचोली ६५, पाचोड ६३, नांदर ३८, अजिंठा ६२, अंबाई ३६, भराडी ४०, गोळेगाव ३०, बोरगाव अर्ज ४५, कन्नड ५६, पिशोर ३५, करंजखेडा ३४, नाचनवेल ४९ 
जालना जिल्हा धावडा १४७, अनवा ७०, वडीगोद्री १२४, भोकरदन ३७, सिपोरा बाजार ४२, पिंपळगाव रेणूकाई ६०, हसनाबाद ४०, आष्टी ३२, जामखेड ३२, गोंदी ३५, रोहीलागड ३४, सुखापूरी ३६, रांजणी ३०, कुंभार पिंपळगाव ५६ 
परभणी जिल्हा गंगाखेड ४०, महातपुरी ४०, 
 
बीड जिल्हा बीड ३०, जातेगाव ३०, तलवाडा ४५, माजलगाव ३५ 
लातूर जिल्हा मदनसुरी ९१, औसा ३९, किल्लारी ३६, कासार शिरसी ४४, औराद श. ४९, कासारबालकुंदा ५५, बोरोळ ३४
नांदेड जिल्हा देगलूर ३२
उस्मानाबाद जिल्हा ढोकी ३३, पाडोळी ५०, नळदुर्ग ५१, सालगरा ४६, मुळज ४०, डाळिंब ५८,  मोहा ३९.

 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...