औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १०००० रुपये प्रतिक्‍विंटल

 In Aurangabad, Lalbaug mango is available at 8000 to 10000 rupees per quintal
In Aurangabad, Lalbaug mango is available at 8000 to 10000 rupees per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) लालबाग आंब्याची केवळ ७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना किमान ८००० ते कमाल १०००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी २२ क्‍विंटल आवक झालेल्या चिकूला किमान १५०० ते कमाल ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. खरबुजाची ३३५ क्‍विंटल आवक झाली. दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टरबुजाची आवक ४३० क्‍विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या रामफळाचे दर १००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११३ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याला ६०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

अंजिराची आवक ८ क्‍विंटल, तर दर ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २३० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षांचे दर २००० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबाची आवक १४ क्‍विंटल झाली. त्यांना ४०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक १२५ क्‍विंटल, तर दर ४०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. हिरव्या मिरचीची १२० क्‍विंटल आवक झाली. तिला किमान १८०० ते कमाल २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७४७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्यांचे दर ६०० ते १९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

टोमॅटोची आवक ९७ क्‍विंटल, तर दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० किवंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक ४ क्‍विंटल, तर दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

काकडीची आवक ४९ क्‍विंटल, तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला ८०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक ८४ क्‍विंटल, तर दर २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

ढोबळी मिरचीला १००० ते १३०० रुपये

ढोबळी मिरचीची २० क्‍विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १३०० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिला. शेवग्याची आवक ३१ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ४०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची आवक २३ क्‍विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com