Agriculture news in marathi, In Aurangabad, lemon is available at Rs 2500 to 4500 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ७) लिंबांची १६ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ७) लिंबांची १६ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १८३ क्‍विंटल आवक झाली. तिला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५५८ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १३०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १७४ क्‍विंटल, तर दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

वालशेंगाची आवक ११ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍वंटल राहिले. १० क्‍विंटल आवक झालेल्या चवळीचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 
काकडीची ४८ क्‍विंटल आवक झाली. तिला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ५७ क्‍विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. फ्लॉवरची आवक ३४ क्‍विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

शेवग्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या काशिफळाला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबाची आवक १८ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर २५० ते ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १५० ते २५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...