नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
औरंगाबादेत लिंबांना ३५०० ते ४००० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) ११ क्विंटल लिंबांची आवक झाली. त्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) ११ क्विंटल लिंबांची आवक झाली. त्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
लिंबांच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. ३० सप्टेंबरला १४ क्विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १ ऑक्टोबरला ९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३ ऑक्टोबरला २२ क्विंटल आवक झाली. तेव्हा लिंबांचे दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ ऑक्टोबरला ३४ क्विंटल आवक, तर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सात ऑक्टोबरला आवक २५ क्विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये, ८ ऑक्टोबरला ५ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३५०० रुपये, ९ ऑक्टोबरला ३० क्विंटल आवक, तर दर १८०० ते ३२०० रुपये, तर १० ऑक्टोबरला आवक २४ क्विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ ऑक्टोबरला १७ क्विंटल आवक झाली.
सीताफळाची आवक मंदच
औरंगाबाद बाजार समितीमध्ये सीताफळाची आवक मंदच आहे. गत पंधरवड्यात केवळ तीन वेळा सीताफळाची आवक झाली. ९ ऑक्टोबरला ३ क्विंटल आवक झालेल्या सीताफळांना ६५०० ते १३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १० ऑक्टोबरला ७ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. सोमवारी (ता. १४) सीताफळाची आवक २३ क्विंटल झाली. त्या वेळी २००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 1028
- ››