In Aurangabad, maize is priced within the guaranteed rate
In Aurangabad, maize is priced within the guaranteed rate

औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दर

औरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. तरीही दर मात्र हमी दराच्या आतच आहेत. दुसरीकडे हरभऱ्याची आवक नगण्य आहे. तर, सोयाबीनचे सरासरी दर पाच हजाराच्या आतच राहिले.

औरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. तरीही दर मात्र हमी दराच्या आतच आहेत. दुसरीकडे हरभऱ्याची आवक नगण्य आहे. तर, सोयाबीनचे सरासरी दर पाच हजाराच्या आतच राहिले.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाजरीची ४६९ क्‍विंटल आवक झाली. ७ ते २९८ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी १६१५ ते १७९८ रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. हरभऱ्याची आवक केवळ दोन वेळा झाली. दोन्ही वेळेला प्रत्येकी ४ क्‍विंटल आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३८०० ते ५३५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बाजार समितीमध्ये मक्याची सर्वाधिक ५४९४ क्‍विंटल आवक झाली. दर सरासरी १२०० ते १४७५ रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले.

सोयाबीनची ४३० क्‍विंटल आवक झाली. ३५ ते १०८ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ४५०० ते ४८५० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान दर मिळाला. गव्हाची आवक ८४५ क्‍विंटल झाली. ७५ ते १८४ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाचे सरासरी दर १८५० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले.

बोरांची तीन वेळा आवक

औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात बोरांची तीन वेळा आवक झाली. अनुक्रमे ९,७ व ५ क्‍विंटल मिळून २१ क्‍विंटल आवक झालेल्या बोराचे सरासरी दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मोसंबीची चार वेळा मिळून १०७ क्‍विंटल आवक झाली. ११ ते ४३ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मोसंबीला सरासरी २१०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com