औरंगाबादमध्ये मका ९२५ ते ११५५ रुपये प्रति क्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मक्याचे दर हमी दराच्या आतच राहिले. मक्याला सरासरी किमान ९२५ ते कमाल ११५५ रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.
 In Aurangabad, maize rate Rs 925 to Rs 1155 per quintal
In Aurangabad, maize rate Rs 925 to Rs 1155 per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मक्याचे दर हमी दराच्या आतच राहिले. मक्याला सरासरी किमान ९२५ ते कमाल ११५५ रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ मे रोजी मक्याची १०१ क्विंटल आवक झाली. या मक्याला १००० ते ११५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २४ मे रोजी २२० विंटल आवक झालेल्या मक्याचे दर १००० ते ११५५ रुपये प्रति क्विंटल राहिले. १३५ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ९२५ ते १००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २८ मे रोजी १५२ क्विंटल आवक झाली. दर १००० ते ११५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० मे रोजी ८० क्विंटल आवक झाली. दर ९५० ते ११२५ रुपये प्रति क्‍विंटल असे मिळाले. २३ मे रोजी तुरीची ३ क्विंटल आवक झाली. या तुरीला ४३०० ते ४८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.  ज्वारीचे दर दोन हजारच्या पुढेच 

बाजार समितीमध्ये २३ मे रोजी ज्वारीला २१५० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २४ मे रोजी चार क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर दोन हजार ते २ हजार १७५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. २६ मे रोजी तीन क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ मे रोजी तीन क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० मे रोजी ५८ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला २००० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.  बाजरी १००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल 

२३ मे रोजी बाजरीची आवक सहा क्विंटल, तर दर १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २४ मे रोजी ५९ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १४२५ ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २६ मे रोजी ३१ क्विंटल आवक झाली. दर १७०० ते २१०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २८ मे रोजी ३२ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ३० मे रोजी ११ क्विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर १२२५ ते १३२५ रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com