Agriculture news in marathi In Aurangabad, maize rate Rs 925 to Rs 1155 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये मका ९२५ ते ११५५ रुपये प्रति क्‍विंटल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मक्याचे दर हमी दराच्या आतच राहिले. मक्याला सरासरी किमान ९२५ ते कमाल ११५५ रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मक्याचे दर हमी दराच्या आतच राहिले. मक्याला सरासरी किमान ९२५ ते कमाल ११५५ रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ मे रोजी मक्याची १०१ क्विंटल आवक झाली. या मक्याला १००० ते ११५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २४ मे रोजी २२० विंटल आवक झालेल्या मक्याचे दर १००० ते ११५५ रुपये प्रति क्विंटल राहिले. १३५ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ९२५ ते १००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २८ मे रोजी १५२ क्विंटल आवक झाली. दर १००० ते ११५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० मे रोजी ८० क्विंटल आवक झाली. दर ९५० ते ११२५ रुपये प्रति क्‍विंटल असे मिळाले. २३ मे रोजी तुरीची ३ क्विंटल आवक झाली. या तुरीला ४३०० ते ४८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

ज्वारीचे दर दोन हजारच्या पुढेच 

बाजार समितीमध्ये २३ मे रोजी ज्वारीला २१५० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २४ मे रोजी चार क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर दोन हजार ते २ हजार १७५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. २६ मे रोजी तीन क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ मे रोजी तीन क्विंटल आवक झालेल्या ज्वारीचे दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० मे रोजी ५८ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला २००० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

बाजरी १००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल 

२३ मे रोजी बाजरीची आवक सहा क्विंटल, तर दर १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २४ मे रोजी ५९ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १४२५ ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २६ मे रोजी ३१ क्विंटल आवक झाली. दर १७०० ते २१०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २८ मे रोजी ३२ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ३० मे रोजी ११ क्विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर १२२५ ते १३२५ रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...
हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६०००...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर...नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर...
बाजरीची आवक घटली, दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...