आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये क्विंटल
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची ३३१ क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ६५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची ३३१ क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ६५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी बटाट्यांची ३०० क्विंटल आवक झाली. त्यांचे सरासरी दर ३२०० रुपये प्रति क्विंटल राहिले. मेथीची आवक ७५०० जुड्या, तर सरासरी दर ३५० रुपये प्रतिशेकडा राहिला. पालकाची आवक ४८०० जुड्या झाली. त्यास सरासरी ३०० रुपये प्रतिशेकडाचा दर मिळाला.
कोथिंबिरीची आवक १६४०० जुड्या, तर सरासरी दर १५० रुपये प्रतिशेकडा राहिला. १५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी २७६० रुपये दर मिळाला. कांद्याची आवक ४६५ क्विंटल, तर सरासरी दर २५०० रुपये क्विंटल राहिले. ३२ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला सरासरी १८०० रुपये दर मिळाला. ९४ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर ३००० रुपये राहिले.
वांग्यांची आवक २९ क्विंटल, तर सरासरी दर १६०० रुपये क्विंटल राहिला. तीन क्विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. काकडीची आवक २१ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रुपये राहिला. चार क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ३५०० रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला.
कोबीची आवक १६ क्विंटल, तर सरासरी दर २००० रुपये राहिला. १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ६०० रुपये दर मिळाला. शेवग्याची आवक चार क्विंटल, तर सरासरी दर ८००० रुपये राहिले. चार क्विंटल आवक झालेल्या पपईला सहाशे रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला.
दुधी भोपळ्याची आवक नऊ क्विंटल, तर सरासरी दर ७०० रुपये प्रति क्विंटल राहिले. सात क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक चार क्विंटल, तर सरासरी दर १५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. १४ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ९०० रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला.
मोसंबीची आवक १५ क्विंटल, तर सरासरी दर ३३५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. चार क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांना सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पेरूची आवक ३५ क्विंटल, तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २० क्विंटल आवक झालेल्या अंजीरला सरासरी ३२५० रुपये दर मिळाला.
- 1 of 65
- ››