औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे आठ लाख क्विंटलवर खरेदी

औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवरून खरेदीची प्रक्रिया थांबण्यापूर्वी ७ लाख ७९ हजार ४३१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
In Aurangabad, Nagar district, cotton is purchased at over 7.75 lakh quintals
In Aurangabad, Nagar district, cotton is purchased at over 7.75 lakh quintals

औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवरून खरेदीची प्रक्रिया थांबण्यापूर्वी ७ लाख ७९ हजार ४३१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी जवळपास दहा हजार क्विंटल कापसावर रुई करण्यासाठीची प्रक्रिया बाकी आहे’’, अशी माहिती कापूस पणन महासंघातर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद व नगर जिल्ह्यात कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे बालानगर, सिल्लोड, खामगाव फाटा, तुर्काबाद, निलजगाव, चापडगाव, मिरजगाव व श्रीरामपूर येथे हमी दराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांवरून २१ मार्चपर्यंत ७ लाख ७९ हजार ४३१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. यानंतर संचारबंदी लागू झाली. त्याचा कापूस खरेदीवर परिणाम झाला.

खरेदी थांबली त्यावेळी विविध केंद्रांवर जवळपास ६० हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करणे बाकी होते. सुरक्षेच्या दृष्टीने लागलीच जवळपास ५० हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करून त्याचे रुईत रूपांतर करण्यात आले, अशी माहिती महासंघातर्फे देण्यात आली. 

तूर्त विविध जिनींगमध्ये खरेदी करून ठेवलेल्या कापसासह प्रक्रियाकरून रुईमध्ये रुपांतरीत झालेल्या कापसाच्या सुरक्षेसाठी विमा उतरवण्याचे काम चालू आहे, अशी माहिती महासंघाच्या औरंगाबाद कार्यालयातर्फे देण्यात आली.  केंद्रनिहाय कापूस खरेदी 

दरम्यान, मजुरांअभावी विविध जिनिंगमध्ये जवळपास दहा हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करण्याचे काम बाकी आहे. खरेदी थांबण्यापूर्वी बालानगरच्या केंद्रावरून २ लाख ७ हजार ८०१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यापाठोपाठ सिल्लोडच्या केंद्रावरून १ लाख ७८ हजार ८६५ क्विंटल, खामगाव फाटा येथे ७९ हजार ७१६ क्विंटल, तुर्काबाद १ लाख ९ हजार ४४७ क्विंटल, नीलजगाव ४३ हजार ४५ क्विंटल, चापडगाव ७९ हजार २७८ क्विंटल, मिरजगाव ७१ हजार ८९४ क्विंटल, तर श्रीरामपूरच्या केंद्रावर १९ हजार ३८२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com