औरंगाबादचे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प ठरला उत्कृष्ट 

बाजरी पिकाच्या संशोधनातून लोह व जस्ताचे प्रमाण अधिक असलेले दोन वाण पुढे आले. दोन्ही वाण कुपोषण निर्मूलनात महत्वाचे ठरतील. याविषयीची जागृकता वाढविण्याचा तसेच बाजरीचे पौष्टिकत्व विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. - डाॅ.एस. बी. पवार, प्रमुख राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, औरंगाबाद
research center
research center

औरंगाबाद: राजस्थानातील जोधपूर येथील अखिल भारतीय बाजारा समन्वय प्रकल्पाने औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाला उत्कृष्ट केंद्र म्हणून घोषित केले आहे. पौष्टिक मूल्य असलेल्या बाजरीच्या वाणाची निर्मिती व त्याचा प्रसार व प्रत्यक्ष आहारात वापर करण्यासाठी औरंगाबादच्या प्रकल्पांतर्गत बाजारा संशोधन केंद्राने केलेल्या कार्याची दखल म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे.  आयसीएआर, एआयसीआरपी जोधपूर प्रकल्प समन्वयक डॉ. सी. तारा सत्यवती यांनी २९ एप्रिल २०२० रोजी ऑनलाईन झालेल्या वार्षिक समूहाच्या बैठकीत ही घोषणा केली. या बैठकीला मुख्य अतिथी आयसीआरचे सचिव डॉ. टी. महोपात्रा, आणि डीडीजी. पीक विज्ञान आयसीएआर नवी दिल्ली डॉ टी आर शर्मा हे प्रामुख्याने उपस्थित होते.  औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाने २०१७ -१८ व २०१८- १९ या दोन वर्षात बाजरीचे अनुक्रमे एएचबी -१२०० (fe) व एएचबी १२६९ हे दोन जैव संपृक्त वान राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केले. एएचबी -१२०० (fe)या बाजरी वानात लोहाचे प्रमाण ८७ टक्के तर जस्ताचे प्रमाण ३७ पीपीएम इतके आहे.एएचबी १२६९ या बाजरी वानात लोहाचे प्रमाण ९१% तर जस्ताचे प्रमाण ४३ पीपीएम असल्याची माहिती राष्ट्रीय संशोधन केंद्र औरंगाबाद चे प्रमुख डॉ. एस बी पवार यांनी दिली.गतवर्षी या दोन्ही वाणाचे विद्यापीठ व महाबीज यांच्यामार्फत बीजोत्पादन घेण्यात आले.  आद्यरेषा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत हे वान पोचविण्यात आले आहे. शिवाय त्याचा आहारातही उपयोग सुरू झाला आहे. केंद्र शासनाने आधीच बाजरीचे पौष्टिक मूल्य लक्षात घेऊन त्याचा पौष्टिक अन्नधान्यात समावेश केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून बाजरी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांना या सर्व कामी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण तसेच संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com