Agriculture news in marathi In Aurangabad, only half of the farmers buy maize | Agrowon

औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

२८ जूनला मका खरेदीसाठीचा संदेश आला. परंतु, अजून खरेदीसाठीचे बोलावणे नाही. २० एकरातील उत्पादित मका घरात पडून आहे. कुटुंबातील सदस्यांची ३५, १०५, ११० व ११५ क्रमांकावर असलेल्या माझ्या नोंदणीचा नंबर खरेदीसाठी १५ जुलैच्या आत येतो की नाही देव जाणे.
- ईश्वर सपकाळ, मका उत्पादक, तिडका ता. सोयगाव

१ जूनला ३ एकरातील कुटुंबांकडील मक्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नोंदणी केली. चौकशी करतोय. परंतु, अजून खरेदीसाठी यंत्रणेकडून बोलावणे आले नाही.
- संजय पवार, मका उत्पादक,  मुर्शिदाबादवाडी (ता. फुलंब्री)

औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मक्याची खरेदी प्रचंड संथगतीने सुरू आहे. आजपर्यंत निम्म्याच शेतकऱ्यांची मका खरेदी केली. त्यामुळे १५ जुलैपर्यंतच्या मुदतीत उर्वरित शेतकऱ्यांची मका खरेदी करणे शक्य नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीसाठी ८ केंद्रे सुरू करण्यात आली. या आठ केंद्रांवरून आतापर्यंत ७ हजार ४०५ शेतकऱ्यांनी आपली मका १७६० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दराने खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ ३ हजार ८९३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यांपैकी २४२८ शेतकऱ्यांकडील ६८ हजार ७४४ क्विंटल मका आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला. त्यांपैकी ६४ हजार ४५९ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देण्यात आला. तर, ४२८४ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देणे बाकी आहे. खरेदीच्या एकूण प्रक्रियेत सिल्लोड येथील गोडाऊनची अडचण वगळता इतर कोणत्याही अडचणी नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. 

दोन दिवसापासून गोडाउनच्या अडचणीपायी सिल्लोड येथील मका खरेदी थांबली आहे. लवकरच गोडाऊनची अडचण दूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, असे मार्केटिंग फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.

सूत्रांच्या माहितीनुसार, मका खरेदीसाठी सुरू असलेले पोर्टल राज्यात ६ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदी केल्यानंतर थांबेल. सध्या राज्यात जवळपास ५ लाख ३५ हजार क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांतच खरेदीचा अपेक्षित टप्पा गाठला की ऑनलाइन पोर्टल थांबेल. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करेल की नाही, हा प्रश्न आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...