Agriculture news in marathi In Aurangabad, only half of the farmers buy maize | Agrowon

औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

२८ जूनला मका खरेदीसाठीचा संदेश आला. परंतु, अजून खरेदीसाठीचे बोलावणे नाही. २० एकरातील उत्पादित मका घरात पडून आहे. कुटुंबातील सदस्यांची ३५, १०५, ११० व ११५ क्रमांकावर असलेल्या माझ्या नोंदणीचा नंबर खरेदीसाठी १५ जुलैच्या आत येतो की नाही देव जाणे.
- ईश्वर सपकाळ, मका उत्पादक, तिडका ता. सोयगाव

१ जूनला ३ एकरातील कुटुंबांकडील मक्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नोंदणी केली. चौकशी करतोय. परंतु, अजून खरेदीसाठी यंत्रणेकडून बोलावणे आले नाही.
- संजय पवार, मका उत्पादक,  मुर्शिदाबादवाडी (ता. फुलंब्री)

औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मक्याची खरेदी प्रचंड संथगतीने सुरू आहे. आजपर्यंत निम्म्याच शेतकऱ्यांची मका खरेदी केली. त्यामुळे १५ जुलैपर्यंतच्या मुदतीत उर्वरित शेतकऱ्यांची मका खरेदी करणे शक्य नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीसाठी ८ केंद्रे सुरू करण्यात आली. या आठ केंद्रांवरून आतापर्यंत ७ हजार ४०५ शेतकऱ्यांनी आपली मका १७६० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दराने खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ ३ हजार ८९३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यांपैकी २४२८ शेतकऱ्यांकडील ६८ हजार ७४४ क्विंटल मका आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला. त्यांपैकी ६४ हजार ४५९ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देण्यात आला. तर, ४२८४ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देणे बाकी आहे. खरेदीच्या एकूण प्रक्रियेत सिल्लोड येथील गोडाऊनची अडचण वगळता इतर कोणत्याही अडचणी नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. 

दोन दिवसापासून गोडाउनच्या अडचणीपायी सिल्लोड येथील मका खरेदी थांबली आहे. लवकरच गोडाऊनची अडचण दूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, असे मार्केटिंग फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.

सूत्रांच्या माहितीनुसार, मका खरेदीसाठी सुरू असलेले पोर्टल राज्यात ६ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदी केल्यानंतर थांबेल. सध्या राज्यात जवळपास ५ लाख ३५ हजार क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांतच खरेदीचा अपेक्षित टप्पा गाठला की ऑनलाइन पोर्टल थांबेल. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करेल की नाही, हा प्रश्न आहे.


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...