Agriculture news in marathi In Aurangabad, orange is 500 to 1000 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २१) संत्र्यांची १५५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना किमान ५०० ते कमाल १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २१) संत्र्यांची १५५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना किमान ५०० ते कमाल १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ११५ क्‍विंटल आवक झाली. तिला किमान २००० ते कमाल ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५६५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्यांचा दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. फ्लॉवरची आवक ४४ क्‍विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ किवंटल आवक झालेल्या वांग्यांना ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गवारीची आवक ७ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

भेंडीची आवक ३७ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९२ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. लिंबांची आवक २५ क्‍विंटल, तर दर ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४७ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बदाम व लालबाग आंब्याची आवक १४ क्‍विंटल, तर दर ७ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

दुधी भोपळ्याची आवक २० क्‍विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला १५०० ते २००० रुपये दर मिळाला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना ६०० ते ७०० रुपये दर मिळाला. कारल्याची आवक ३ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मोसंबीची आवक १३५ क्‍विंटल, तर दर ६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...