औरंगाबादमध्ये वाटाणा १३०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

 In Aurangabad, peas cost Rs 1300 to Rs 2500 rupees per quintal
In Aurangabad, peas cost Rs 1300 to Rs 2500 rupees per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी(ता.४) वाटाण्याची ११० क्‍विंटल आवक झाली. या वाटाण्याला १३०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५५ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६८७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८० क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

वांग्याची आवक ४५ क्‍विंटल तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक १८ क्‍विंटल तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

१६५ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूचे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

२० क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८३ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचा दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मकाची आवक ४२ क्‍विंटल तर दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ९० ते १४० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकची आवक १४ हजार जुड्यांची झाली. पालकला ११० ते २२० रुपये प्रतिशेकड्याचे दर मिळाले. कोथंबीरची आवक २७ हजार जुड्यांची तर दर १०० ते १५० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी  दिली.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com