औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.११) बटाट्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
In Aurangabad, potato is available at 1000 to 1800 rupees per quintal
In Aurangabad, potato is available at 1000 to 1800 rupees per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.११) बटाट्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्यांची आवक ८०९ क्विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३९ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोंची आवक ६५ क्विंटल, तर दर ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ८ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २००० ते २५०० रुपये दर मिळाला. 

काकडीची आवक २५ क्विंटल, तर दर किमान ५०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. कोबीची आवक ६० क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ५५ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. आंब्यांची आवक १६ क्विंटल, दर ५००० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या पपईला ६०० ते १२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

कैरीची आवक ९५ क्विंटल झाली. दर किमान ८०० ते कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक ३० क्विंटल झाली. तिला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या दिलपसंदला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. मक्‍याची आवक १३ क्विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये मिळाला. ३५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक ७ क्विंटल , तर दर १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.  संत्र्यांना १००० ते ४००० हजार रुपये 

टरबुजाची १३३ क्विंटल आवक झाली. त्यांना किमान ६०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. १३ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १००० ते ४००० हजार रुपये दर मिळाला. खरबुजाची आवक ५२ क्विंटल, तर दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षांना किमान २००० ते कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com