Agriculture news in marathi In Aurangabad, potato is available at 1000 to 1800 rupees per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.११) बटाट्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.११) बटाट्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्यांची आवक ८०९ क्विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३९ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोंची आवक ६५ क्विंटल, तर दर ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ८ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २००० ते २५०० रुपये दर मिळाला. 

काकडीची आवक २५ क्विंटल, तर दर किमान ५०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. कोबीची आवक ६० क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ५५ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. आंब्यांची आवक १६ क्विंटल, दर ५००० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या पपईला ६०० ते १२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

कैरीची आवक ९५ क्विंटल झाली. दर किमान ८०० ते कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक ३० क्विंटल झाली. तिला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या दिलपसंदला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. मक्‍याची आवक १३ क्विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये मिळाला. ३५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक ७ क्विंटल , तर दर १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

संत्र्यांना १००० ते ४००० हजार रुपये 

टरबुजाची १३३ क्विंटल आवक झाली. त्यांना किमान ६०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. १३ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १००० ते ४००० हजार रुपये दर मिळाला. खरबुजाची आवक ५२ क्विंटल, तर दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षांना किमान २००० ते कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 
 


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत लिंबूच्या दरात किंचित सुधारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरचीला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत दहा ट्रकने...पुणे ः कोरोना टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या पुणे...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत जांभूळ ८००० ते १२००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
पुण्यातील फूलबाजारात फुलांची अत्यल्प आवकपुणे : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन...
राज्यात वांगी १००० ते ४००० रुपये क्विंटलपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, हिरवी मिरचीला उठावसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपुरात मोसंबीच्या दरात चढ-उतार कायम नागपूर  ः मोसंबीची आवक होत असून दर क्‍...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याच्या आवकेत...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादमध्ये मिरची, फ्लॉवर व...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबिर, मेथीला उठाव,...सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ७० ट्रक...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादमध्ये लसूण २४०० ते ६५०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात कांदा आवक कमीच; अपेक्षित...नगर  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे...
परभणीत कैरी २००० ते ४००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
सांगलीत बटाटा १८०० ते २२०० रुपये...सांगली  : येथील विष्णूअण्णा फळे व भाजीपाला...
आटपाडी बाजार समितीत डाळिंब सौदे सुरूआटपाडी, जि. सांगली : येथील बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन आवकेत वाढ, दरात...अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात 'कोरोना’मुळे मंदावली शेतमालाची...नागपूर  ः कोरोना लॉकडाऊनचा परिणाम कळमणा...