औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २७) बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. या बटाट्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
In Aurangabad, potatoes fetch an average of Rs 800 per quintal
In Aurangabad, potatoes fetch an average of Rs 800 per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २७) बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. या बटाट्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. बटाट्याचा सरासरी दर ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी द्राक्षाची ७७ क्विंटल आवक झाली. या द्राक्षाला सरासरी ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. १३ क्विंटल आवक झालेल्या रामफळाचे सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टरबुजाची आवक १३० क्विंटल, तर सरासरी दर ६५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३७ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाला सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मोसंबीची आवक ७ क्विंटल, तर सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. चिकूची आवक २५ क्विंटल, तर सरासरी दर १००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या अंजिराला सरासरी ४००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची आवक ७५ क्विंटल तर सरासरी दर २००० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ११९७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३७ क्विंटल, तर सरासरी दर ३२५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. १११ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ४५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक २९ क्विंटल, तर सरासरी दर ५५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या गवारला सरासरी २५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

काकडीची आवक ३८ क्विंटल तर सरासरी दर १२०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. पत्ताकोबीची आवक ५६ क्विंटल, तर सरासरी दर २७५ रुपये प्रति क्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. मेथीची आवक १४,५०० जुड्या झाली. या मेथीला सरासरी २५० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. ८६०० जुड्यांची आवक झालेल्या पालकला सरासरी १९० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला.

कोथिंबिरीची आवक ११३०० जुड्या, तर सरासरी दर १०० रुपये प्रति शेकडा राहिले. १० क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कैरीची आवक १२ क्विंटल, तर सरासरी दर ८००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ क्विंटल आवक झालेल्या पपईला सरासरी ४७५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com