मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) बटाट्याची ९०० क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) बटाट्याची ९०० क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ३४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १२ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल राहिले. फ्लॉवरची आवक ६८ क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ७०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कैरीची आवक ६४ क्विंटल, तर दर १००० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४० क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ४७८ क्विंटल, तर दर ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला १००० ते १५०० रुपये दर मिळाला.
कोबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. शेवग्याची आवक ३३ क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. शिराळी दोडक्याची आवक २१ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ११२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. वांग्यांची आवक २० क्विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९४ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
कोथिंबिरीची १० हजार ९०० जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरीचे दर ६०० ते ७०० रुपये प्रति शेकडा राहिले. १६००० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ३०० ते ४०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला. लिंबांची आवक ३४ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. टरबुजाची आवक ७९ क्विंटल, तर दर ७०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५२ क्विंटल आवक झालेल्या खरबूजला १००० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
- 1 of 65
- ››