औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची, भेंडीचे दर अस्थिर

औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच गडगडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे श्रावण महिन्यात आवकेत अस्थिरता असली तरी बटाट्याचे दर गत आठवडाभरात जवळपास स्थिर आहेत.
In Aurangabad, prices of potatoes are stable, brinjal, chilli and okra are volatile
In Aurangabad, prices of potatoes are stable, brinjal, chilli and okra are volatile

औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच गडगडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे श्रावण महिन्यात आवकेत अस्थिरता असली तरी बटाट्याचे दर गत आठवडाभरात जवळपास स्थिर आहेत. वांगी, मिरची, भेंडी, लसूण, आल्याचे आवक व दर अस्थिरच असल्याचे चित्र  आहे.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ ते २९ ऑगस्टदरम्यान भाजीपाल्याच्या आवकेत व दरात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. या कालावधीत २७१ क्‍विंटल एकूण आवक झालेल्या वांग्यांचे सरासरी दर ५५० ते १०५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. वांग्यांची आवक ३३ ते ५२ क्‍विंटल दरम्यान झाली. हिरव्या मिरचीची आठवडाभरात ५२८ क्‍विंटल आवक झाली. ३३ ते १४८ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ७०० ते १७५० रुपये राहिले.

भेंडीची एकूण १४७ क्‍विंटल आवक झाली. १७ ते ३९ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या भेंडीला सरासरी ७५० ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लसणाची आठवड्यातून केवळ २ वेळा आवक झाली. ६९ व ४६ क्‍विंटल मिळून ११८ क्‍विंटल आवक झालेल्या लसणाचे सरासरी दर ६१२५ ते १०००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

आल्याचीही केवळ दोन वेळा आवक झाली. ४८० व १७१ क्‍विंटल मिळून ६५१ क्‍विंटल आवक झालेल्या आल्याचे सरासरी दर ८०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक ही मध्यप्रदेशातून होते. आठवड्यात एकवेळ आवक न होण्याचा अपवाद वगळता २१३६ क्‍विंटल बटाट्याची आवक झाली. १३७ ते ६०० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बटाट्याचे सरासरी दर १००० ते ११५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान स्थिर राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com