औरंगाबादेत श्रावणाची पहिली सर

औरंगाबादेत श्रावणाची पहिली सर
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सर

औरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने औरंगाबाद शहराला दिलेली ओढ गुरुवारी (ता. १६) संपली. सकाळपासूनच पावसाने शहरात झड लागली असून सकाळी साडेआठपर्यंत ३.५ मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा हवामान केंद्रात झाली.  गेल्या वीस पंचवीस दिवसात शहरात म्हणावा तसा पाऊस झालेला नव्हता. शहराच्या कोणत्या तरी भागात काही थेंब पडणे हाच काय तो झालेला पाऊस. मध्यम स्वरूपाचा पाऊस हा गेल्या महिनाभरात दुर्मिळ झाला होता. गुरुवारी मात्र सकाळी पावसाने सुखद धक्का देत शहराला भिजवून काढले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवढ्याभरात शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com