औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३१) शेवग्याची २३ क्विंटल आवक झाली. त्याला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीत शनिवारी हिरव्या मिरचीची १२५ क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ४२० क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची आवक १५५ क्विंटल, तर दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३२ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १००० ते २००० रुपये दर मिळाला. वांग्यांची आवक १३ क्विंटल, तर दर १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १८ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाला ७३ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. भेंडीची आवक ७७ क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये राहिले. ३६ झालेल्या कोबीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला.

लिंबांची आवक १८ क्विंटल, तर दर एक हजार ते ३५०० रुपये, दुधी भोपळ्याचे आवक १२ क्विंटल, तर दर ८०० ते ९०० रुपये, ढोबळी मिरचीची आवक ४५ क्विंटल, तर दर १२०० ते २०००  रुपये, चवळीची आवक १४ क्विंटल, तर दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला.१५ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांना १५०० ते २००० रुपये दर मिळाला. कारल्याची आवक २० क्विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७७ क्विंटल आवक झालेल्या मक्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

डाळिंबांची ३० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. १५०० क‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ८५०० मेथी जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ६०० ते ८०० रुपये दर मिळाला. ४ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ५०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक १३ हजार जुड्यांची झाली. तिला ४०० ते ६०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com