औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २४ ) शेवग्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी १६९ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली. तिला ३२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. २१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १७०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची आवक १७२ क्विंटल झाली. त्यांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ३० क्विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १५०० ते ३५००  रुपये प्रतिक्विंटल राहिले. १८ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ४९ क्विंटल, तर दर १६०० ते २२०० रुपये,  वालाच्या शेंगांची दहा क्विंटल आवक, तर दर ते ३००० रुपये, चवळीची आवक २५ क्विंटल, तर दर १६०० ते १८००  रुपये, मक्याची आवक ९४ क्विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

काकडीची आवक ९४ क्विंटल झाली. तिला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर  ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. कारल्याची आवक ३९ क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २४ क्विंटल आवक झालेल्या दूधी भोपळ्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची आवक ३९ क्विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४८ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.ढोबळ्या मिरचीची आवक ५२ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

भुईमूग शेंगांनची २० क्विंटल आवक झाली. त्यांना ३७०० शे ५२०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. डाळिंबाची आवक २३ क्विंटल, तर दर ४०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. ६ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाचे दर  ६०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा, तर १५००० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com