औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्‍विंटल १००० ते १५०० रुपये

औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्‍विंटल १००० ते १५०० रुपये
औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्‍विंटल १००० ते १५०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २५) ढोबळ्या मिरचीची ३७ क्‍विंटल आवक झाली. या ढोबळ्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १४२ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३९३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २५० ते ११५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २५० ते ३५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

भेंडीची आवक २० क्‍विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. चवळीची आवक ८ क्‍विंटल तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११० क्‍विंटल आवक झालेल्या मकाला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ३१ क्‍विंटल तर दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूचे दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. दुधी भोपळ्याची आवक ७ क्‍विंटल झाली. या दुधी भोपळ्याला २५० ते ५५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१८० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भुईमूग शेंगांची २५ क्‍विंटलची आवक होऊन २००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या डांगरचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

३०९ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर १०० ते २५०० रुपये प्रतक्‍विंटल राहिले. २५ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com