Agriculture news in marathi, In Aurangabad, Sitafal is available at Rs 2500 to 7000 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादेत सीताफळ २५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१९) सीताफळाची ४७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१९) सीताफळाची ४७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी संत्र्याची १४ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मोसंबीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. ५५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ७०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 

कोथिंबिरीची आवक १३ हजार जुड्या; तर दर ४०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २७ क्‍विंटल आवक झालेल्या काशीफळाला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७७ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६२ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

कारल्याची आवक ४ क्‍विंटल, तर दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८० क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

तीन क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

८९ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६१५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले; तर ८१ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...
शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त करा :...सांगली  ः गेली काही वर्षे दुष्काळ आणि...
परभणीत गाजर १८०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलननाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी...
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः...बुलडाणा  : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या...
...अखेर जायकवाडीतून रब्बी सिंचनासाठी...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पावरून कालव्या‌द्वारे...
अकरा महिन्यांनंतर पिकांची नुकसानभरपाईपुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव...
सांगलीत आडसाली उसाला महापुराचा फटकासांगली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात एक लाख...बीड : यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड या...
परभणी येथे दूध संकलनातील घट सुरूचपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत परभणी येथील दुग्ध...