agriculture news in Marathi authority of tanker permission to BDO Maharashtra | Agrowon

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

सध्या राज्यात टाळेबंदी सुरू असताना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर्स मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले असून याचा शासन निर्णय जारी झाला आहे.

मुंबई: सध्या राज्यात टाळेबंदी सुरू असताना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर्स मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले असून याचा शासन निर्णय जारी झाला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता खात्यातर्फे टँकर्सची तरतूद करण्यात येते. या अनुषंगाने यंदाही टँकर्सची तरतूद करण्यात आलेली आहे. आजवर जिल्ह्यातील टँकर्सच्या मंजुरीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना होते. तथापि, सध्या कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कामाचा बोजा आलेला आहे. यातच टाळेबंदी कालावधीत ठिकठिकाणी स्थलांतर करणाऱ्या मजूर व कामगारांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

या अनुषंगाने टँकर्स मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना असल्यास संबंधितांना पिण्याच्या पाण्याचा तातडीने पुरवठा करता येणार आहे. नेमक्या याच कारणामुळे प्रांताधिकाऱ्यांना टँकर्स मंजुरीचे अधिकार असावेत अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. राज्याच्या महसूल व वन विभागाने ही मागणी मान्य केली असून याचा शासन निर्णय देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. 

मंत्री पाटील यांनी या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, कोविड-१९ चा प्रतिकार करण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे प्रशासनावर खूप तणाव आलेला असल्याने टँकर्स मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण हे अतिशय स्वागतार्ह आहे. राज्यात यंदा पाणी टंचाईचे गत वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणावर सावट असले तरी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यासाठी सज्ज असल्याची ग्वाही देखील मंत्री पाटील यांनी  दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...