agriculture news in marathi, automatic weather stations Implemented, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

सातारा :  कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्याद्वारे आता पावसाचे मापन होणार आहे. 

सातारा :  कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्याद्वारे आता पावसाचे मापन होणार आहे. 

महसूल विभागामार्फत २००८-०९ मध्ये जिल्ह्यातील ९१ महसुली मंडळांमध्ये साधी पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यापूर्वी ही मापके तालुका स्तरावर होती. मात्र तेथे पावसाची अचूक नोंद होत नसल्याने ती पुढे मंडळ स्तरावर बसविण्यात आली. सध्या याच पर्जन्यमापकांद्वारे पावसाची नोंद होऊन त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांना दिला जातो. त्याच्या मोजमापावरून आपत्ती निवारण निधीतून शेतकरी व नागरिकांना अतिपाऊस, पुरामुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. जेवढ्या प्रमाणात पाऊस होईल, त्यानुसार मदतीचा मार्ग ठरत असतो.

मात्र, ही यंत्रणा कित्येकदा बिघडलेल्या स्वरूपात असते. कोतवालांमार्फत पर्जन्याचे मोजमाप घेतले जाते. त्यातून चुकीची आकडेवारीही महसूल विभागाला प्राप्त होत असते. यावर उपाय म्हणून राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत स्वयंचलित हवामान केंद्रे (ऑटोमेटिक वेदर स्टेशन) ९१ महसूल मंडळांत कार्यान्वित करण्यात आली आहेत.

या पावसाळ्यात त्याद्वारे पर्जन्यमापन केले जाणार आहे. यातून तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग, दिशा, आर्द्रता त्यामुळे किती पाऊस झाला, याची अचूक माहिती प्रशासनाला मिळण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी सांगितले. 

बहुतांश वेळा मंडळाच्या ठिकाणी पाऊस कमी होतो; परंतु इतर गावे, वाड्यावस्त्यांवर जास्त पाऊस पडतो. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे अतिपाऊस होऊनही इतर गावांतील आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही, तर इतर गावांमध्ये कमी पाऊस होऊनही मंडळाच्या ठिकाणी अतिपाऊस झाल्याने त्याचा फायदा इतरांना होतो. हे टाळून योग्य आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी गावनिहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविणे गरजेचे आहे.

इतर ताज्या घडामोडी
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...