मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर

मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर
मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर

अमरावती  ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने सिंभोरा (ता. मोर्शी) येथे २१ हेक्‍टर क्षेत्रावर प्रस्तावीत मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. सोमकुवर, अमरावती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय असून त्याद्वारे रोजगार व उत्पन्न वाढविणे शक्‍य आहे.  राज्यातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनातील अपेक्षित असलेला वृद्धीदर तसेच या व्यवसायानुरुप वाढ होण्यासाठी सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ही परिसरातील गरज महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे सांगून डॉ. पातूरकर म्हणाले की, सिंभोरा येथील २१ हेक्‍टर जागोवर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात नागपूर, उदगीर आणि कोकणातील शिरगाव या तीन ठिकाणीच मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे. मोर्शीतील हे महाविद्यालय त्या क्रमवारीत चौथे आहे. राज्यात जवळपास पाच ते सहा पशु व मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेचे काम सुरू आहे. त्यातले मोर्शीचे हे महाविद्यालय सर्वात लवकर मंजूर होऊन सुरू होत आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता ३० आहे. या महाविद्यालयासाठी ९८ पदांच्या निर्मितीस तसेच पाच वर्षासाठी १०८ कोटी ९५ लाख इतक्‍या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अकोल्याचा प्रस्ताव बासनात कृषिमंत्री होताच डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भागात मत्स्यविज्ञान महाविद्यालय मंजूर करून निधीही आणला. अकोला येथेसुद्धा पशुविज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय प्रस्तावीत आहे. परंतू स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा तिढा सुटू शकला नसल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com