Agriculture news in marathi; Availability of trained manpower from the College of Fisheries: Dr. Paturkar | Agrowon

मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अमरावती  ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला.

अमरावती  ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने सिंभोरा (ता. मोर्शी) येथे २१ हेक्‍टर क्षेत्रावर प्रस्तावीत मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. सोमकुवर, अमरावती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय असून त्याद्वारे रोजगार व उत्पन्न वाढविणे शक्‍य आहे. 

राज्यातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनातील अपेक्षित असलेला वृद्धीदर तसेच या व्यवसायानुरुप वाढ होण्यासाठी सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ही परिसरातील गरज महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे सांगून डॉ. पातूरकर म्हणाले की, सिंभोरा येथील २१ हेक्‍टर जागोवर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात नागपूर, उदगीर आणि कोकणातील शिरगाव या तीन ठिकाणीच मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे. मोर्शीतील हे महाविद्यालय त्या क्रमवारीत चौथे आहे. राज्यात जवळपास पाच ते सहा पशु व मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेचे काम सुरू आहे. त्यातले मोर्शीचे हे महाविद्यालय सर्वात लवकर मंजूर होऊन सुरू होत आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता ३० आहे. या महाविद्यालयासाठी ९८ पदांच्या निर्मितीस तसेच पाच वर्षासाठी १०८ कोटी ९५ लाख इतक्‍या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

अकोल्याचा प्रस्ताव बासनात
कृषिमंत्री होताच डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भागात मत्स्यविज्ञान महाविद्यालय मंजूर करून निधीही आणला. अकोला येथेसुद्धा पशुविज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय प्रस्तावीत आहे. परंतू स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा तिढा सुटू शकला नसल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे.


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...