परभणी जिल्ह्यात तीस हजार हेक्टर ऊस कारखान्यांना उपलब्ध

परभणी ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये लागवड झालेला ३० हजार ८१० हेक्टरवरील ऊस यंदा साखर कारखान्यांना उपलब्ध होऊ शकेल.
Available to 30,000 hectare sugarcane factories in Parbhani district
Available to 30,000 hectare sugarcane factories in Parbhani district

परभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये लागवड झालेला ३० हजार ८१० हेक्टरवरील ऊस यंदा साखर कारखान्यांना उपलब्ध होऊ शकेल. प्रतिहेक्टरी सरासरी ५८.५६ टन उत्पादकता अपेक्षित आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, यंदा आजवर कानडखेड (ता.पूर्णा), अमदापूर (ता.परभणी), लिंबा (ता.पाथरी), देवनांदरा (ता. पाथरी), सायखेडा (ता.सोनपेठ) या पाच साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरु केले आहे. अन्य एका कारख्यान्याच्या गाळप हंगामाबाबत प्रश्नचिन्ह आहे.

गतवर्षी (२०१९) सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी, येलदरी-सिद्धेश्वर, माजलगाव या मोठ्या प्रकल्पासह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पामध्ये मुबलक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे मोठ्या तसेच मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला.

विशेषतः जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधारे, माजलगाव धरणाचा कालवा, मासोळी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्राताल गंगाखेड, पालम तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले. 

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सन २०११-१२ ते २०१५-१६ या पाच वर्षांत ऊस लागवडीखालील सरासरी क्षेत्र ३२ हजार हेक्टर होते. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात घट झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये उसाचे क्षेत्र ९ हजार हेक्टर इतके कमी झाले होते. सिंचनासाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्राचे प्रमाण कमी अधिक होत आहे. 

२०१९-२० या वर्षात जिल्ह्यात पूर्व हंगामी उसाची ९ हजार ६६७ हेक्टर, सुरु उसाचा १४ हजार ६१९ हेक्टरवर लागवड झाली. 

खोडवा उसाचे क्षेत्र ६ हजार ५२३ हेक्टर आहे. सन २०१८-१९ च्या हंगामात १३ हजार ५८२ हेक्टरवर ऊस लागवड होती. त्या तुलनेत २०१९-२० मध्ये ऊस लागवड क्षेत्रात दुपटीहून अधिक (१७ हजार २२८  हेक्टरने) वाढ झाली आहे.

वर्षेनिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

वर्षे लागवड क्षेत्र
२०१७-१८ २८०१७
२०१८-१९ १३५८२
२०१९-२० ३०८१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com