Agriculture news in marathi; Avalanche rains hit markets in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलावाला पावसाचा फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा आदी बाजार समित्यांमध्ये धान्याच्या लिलावाबाबत सोमवारी (ता. २१) व मंगळवारी (ता. २२) अडचणी आल्या. मंगळवारी तर बाजार समित्यांमध्ये धान्याची अपवाद वगळता आवकच झाली नाही. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले. 

जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा आदी बाजार समित्यांमध्ये धान्याच्या लिलावाबाबत सोमवारी (ता. २१) व मंगळवारी (ता. २२) अडचणी आल्या. मंगळवारी तर बाजार समित्यांमध्ये धान्याची अपवाद वगळता आवकच झाली नाही. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले. 

जळगाव बाजार समितीत यंदा सोयाबीनची आवक हवी तशी सुरू झालेली नाही. मळणी अजून सुरूच आहे. अशातच पाऊस आल्याने मळणी लांबणीवर पडली असून, सोयाबीनचा दर्जाही खालावला आहे. ज्यांनी मळणी पूर्ण करून घेतली. त्या शेतकऱ्यांनी अद्याप विक्री केलेली नाही. कारण, बाजारात सोयाबीनला हमीभावाएवढे दर नाहीत. किमान ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आणणे टाळले आहे. तर ज्यांनी सोयाबीनची वाळवणूक, प्रतवारी करून घेतली, त्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पावसामुळे बाजारात येऊ शकलेला नाही.

अमळनेर, चोपडा येथे लिलावासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु, पावसात शेतीमाल ओला होण्याची, अधिक आर्द्रता वाढण्याची भीती असते. यामुळे अडतदारही लिलावात फारसे सहभागी होत नसल्याची माहिती मिळाली. जळगाव बाजार समितीत धान्य लिलावानंतर त्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांसाठी शेड नाही. यामुळे सोयाबीनची आवक रोडावली आहे. चोपडा येथील बाजारात मागील दोन दिवसांत दोन हजार क्विंटलदेखील सोयाबीनची आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली. अशीच स्थिती अमळनेरात आहे. तर जळगाव बाजार समितीतही फारशी आवक नसल्याची माहिती मिळाली. 

सणासुदीमुळे अडचण
येत्या २५ तारखेपासून म्हणजेच शुक्रवारपासून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होत आहे. सणासुदीमुळे धान्य मार्केट यार्ड बंदची स्थिती राहील. यामुळे या व पुढील आठवड्यातही बाजारात लिलाव फारसे होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. यातच पावसाचा व्यत्यय आल्याने लिलावासंबंधी बाजारांमध्ये अडचणी वाढल्या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...