agriculture news in marathi An average of 19% useful water in small lakes in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९ टक्के उपयुक्त पाणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 एप्रिल 2021

परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील लघु तलावांमध्ये सरासरी १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी (सर्व ता. जिंतूर), नखातवाडी (ता. सोनपेठ) या आठ तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपून जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तलावांवर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. 

जिल्ह्यातील अन्य १४ लघु तलावांपैकी ७ तलावांमध्ये २५ टक्केपर्यंत, ६ तलावांमध्ये २५ ते ५० पर्यंत, तर १ तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात पेडगाव तलाव ७ टक्के, आंबेगाव तलाव ४२ टक्के, झरी  तलाव ६० टक्के, तांदूळवाडी  तलाव २० टक्के, राणीसावरगाव तलाव ४९ टक्के, टाकळवाडी तलाव ५ टक्के, कोद्री तलाव १८ टक्के, पिंपळदरी तलाव ४३ टक्के, वडाळी तलाव २६ टक्के, चारठाणा तलाव २९ टक्के,  कवडा तलाव १६ टक्के, मांडवी तलाव ५ टक्के, दहेगाव तलाव ४ टक्के, पाडाळी तलाव २५ टक्के या तलावांचा समावेश आहे.

‘करपरा’त ३४ टक्के पाणी

जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांपैकी करपरा (ता.जिंतूर) मध्यम प्रकल्पात ३४ टक्के आणि मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गोदावरी नदीवरील डिग्रस बंधाऱ्यांमध्ये २५.५० टक्के, मुद्दगल बंधाऱ्यांमध्ये ३९.७ टक्के, ढालेगाव बंधाऱ्यामध्ये ३५.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...