Agriculture News in Marathi An average of 2150 cloves in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक २३६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रति क्विंटल १,२०० ते ३,००० रुपये तर सरासरी दर २,१५० रुपये मिळाला. सध्या परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव सर्वसाधारण होते.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक २३६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रति क्विंटल १,२०० ते ३,००० रुपये तर सरासरी दर २,१५० रुपये मिळाला. सध्या परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव सर्वसाधारण होते. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक १५,११८ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल १,४०० ते ३,३०० मिळाला तर सरासरी दर २,६५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५,७५६ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४०० ते १,४०० तर सरासरी दर ८०० रुपये राहिला. लसणाची आवक २३१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,९०० ते ७,५०० तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. आद्रकची आवक ६०८ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल २,५०० ते ४,५०० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. 

सप्ताहात फळभाज्यांच्या आवकेत चढ-उतार दिसून आला. त्यानुसार दर निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ६,२४९ क्विंटल झाली. वालपापडीला प्रति क्विंटल ३,००० ते ४,८०० असा तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रति क्विंटल ३,००० ते ४,००० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. गाजराची आवक १५८२ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल २,००० ते २,८०० तर सरासरी दर २,४०० रुपये राहिला.

टोमॅटोच्या दरात सुधारणा  
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १००ते ९०० तर  सरासरी ६००, वांगी ४०० ते ६५० तर सरासरी ५२५  व फ्लॉवर १५० ते ४०० सरासरी ३३५ रुपये, असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ३० ते १०० तर सरासरी ७० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ४०० ते ७०० तर सरासरी दर ६२० रुपये, असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते ३२० तर सरासरी १८०, कारले १५० ते २७५ तर सरासरी २२५, गिलके ३५० ते ४७० तर सरासरी ४२५, दोडका ३०० ते ४५० तर सरासरी दर ३६५ रुपये, असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ५९०  क्विंटल झाली. तिला प्रति क्विंटल ८५० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ८,२५६ क्विंटल झाली. मृदुला वाणास ८,००० ते १५,००० तर सरासरी १२,००० रुपये दर मिळाला.

नागपुरात सोयाबीनच्या
दरात हलकी वाढ

नागपूर : केंद्र सरकारने १२ लाख मेट्रीक टन सोयाबीन आयातीचा निर्णय घेतल्यानंतर कळमना बाजार समितीत देखील सोयाबीन दरात काहीशी घसरण अनुभवण्यात आली होती.  ५५०० रुपयांवर दर खाली आले होते. आता पुन्हा दरात काहीशी तेजी अनुभवली जात आहे.

बाजार समितीत नव्या सोयाबीनची प्रतीक्षा लागूनच आहे. नवी आवक झाल्यानंतर दर काय राहतील, या बाबत व्यापाऱ्यांसह शेतकरी देखील साशंक आहेत. सोयाबीनमधील आर्द्रता आणि दर्जा पाहून दर ठरतो, असे व्यापारी सांगतात. ४४०० ते ६६०० असे दर सोयाबीनला गेल्या आठवड्यात होते. हेच दर ६८०० रुपयांवर पोचले आहेत. आवक ७०० क्विंटलची आहे. सद्या बाजारात गहू आवक ८०० क्‍विंटल तर दर १८०० ते २०७०, तांदूळ आवक १० आणि दर २५०० ते २७००, हरभरा दर ४४०० ते ४९९० आणि आवक ७७ क्‍विंटलची होती. तुरीचे व्यवहार ६१०० ते ६३०० रुपयांनी झाली. बाजारात नव्या तुरीची आवक होण्यास अजून बराच कालावधी आहे. तुरीची आवक चार क्‍विंटलच्या घरात राहिली. 

संत्रा आवक जोमात 
कळमना बाजार समितीत संत्रा फळांची आवक सुरू झाली आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना २३०० ते २८०० रुपये क्‍विंटलचा दर होता. संत्र्याची आवक ६०० क्‍विंटलच्या घरात होती. ऑक्‍टोंबर महिन्यात संत्रा आवक वाढीस लागेल, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या संत्र्याला ५०० ते ६०० रुपये, मध्यम फळांना ४०० ते १८०० रुपये असा दर होता. या आठवड्यात लहान फळांचे दर ४०० ते ६०० आणि मध्यम आकाराच्या फळांचे दर १३०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर पोचले.

मोसंबीची आवक घटली 
बाजारात मोसंबीची देखील आवक नियमित असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांचे व्यवहार २४०० ते २८०० रुपये क्‍विंटलने झाले. त्याचवेळी मध्यम आकाराच्या फळांना १६०० ते २००० आणि लहान फळांना ८०० ते १००० रुपये दर मिळाला. या आठवड्यात लहान फळांना १००० ते १२००, मध्यम फळांना १६०० ते २००० आणि मोठ्या फळांना २४०० ते २६०० रुपये असा दर होता.

नगरला वांगी, फ्लॉवर, भेंडीच्या दरात सुधारणा 
नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दर दिवसाला एक हजार क्विंटलपेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक झाली. बाजार समितीत वांगी, फ्लावर, भेंडीच्या दरात सुधारणा झाली आहे. भुसारची आवक जेमतेम असून, सोयाबीन, मुगाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अलीकडच्या काळात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. टोमॅटोची दर दिवसाला १२२ क्विंटलची आवक होऊन प्रती क्विंटल ८०० ते २ हजार रुपयांचा दर मिळाला. वांग्याची २० ते २२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, फ्लॉवरची ३३ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार, काकडीची ५३ ५५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ६००, गवारची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन ८ हजार ते १२ हजार, घोसाळ्याची ४ ते ६ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, दोडक्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार, कारल्याची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५००, भेंडीची ४५ ते ४८ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार, बटाट्याची ११५ ते १२० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२००, हिरव्या मिरचीची ९३ ते ९५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० रुपये, शेवग्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार, शिमला मिरचीची १९ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, मुळा, चवळी, बीट, वाटाण्याची आवक चांगली राहिली.

सोयाबीनला ६ हजार ४०० रुपयांपर्यंत दर 
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू, गूळाची आवक होत आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल ४ हजार ५०० ते ६ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला आहे. गावरान ज्वारीला २ हजारांपर्यंत तर बाजरीला १६०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. तुरीला ६ हजार, हरभऱ्याला ४८५०, मुगाला ६७००, उडदाला ६५००, गव्हाला १९५१, गुळाला ३ हजार ९००, मक्याला १६५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.

सोलापुरात वांगी, सिमला मिरची, घेवडा वधारला
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, सिमला मिरची, घेवड्याला मागणी राहिली. त्यांचे दरही चांगलेच वधारलेले राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात रोज वांग्याची २० ते ३० क्विंटल, सिमला मिरचीची १५ ते २० क्विंटल आणि घेवड्याची ५ ते १० क्विंटल अशी आवक राहिली. पण गेल्या पंधरवड्यापासून त्यांना मागणी वाढली आहे. या सप्ताहात त्यांची आवकही तुलनेने कमी राहिली. त्यामुळे संपूर्ण सप्ताहभर दर वधारलेलेच राहिले. वांग्याला प्रति क्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ४००० हजार रुपये आणि सर्वाधिक ७ हजार रुपये, सिमला मिरचीला किमान १३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये आणि घेवड्याला किमान ३००० हजार रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.

त्या शिवाय लसूण, हिरवी मिरचीलाही चांगला दर मिळाला. लसणाची आवक मात्र एकदिवसाआड १०० ते १२५ क्विंटलपर्यंत तर हिरव्या मिरचीची आवक २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. लसणाला प्रति क्विंटलला किमान २१०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ७ हजार रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये तर सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. भाज्यामध्ये कोथिंबीर, मेथीचे दर टिकून राहिले. त्यांची आवक प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत राहिले. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी ८०० ते १२०० रुपये आणि मेथीला १००० ते १३०० रुपये असा दर मिळाला.

कांदा दरात सुधारणा
कांद्याच्या दरात या सप्ताहात किंचित सुधारणा झाली. कांद्याची आवक मात्र तुलनेने कमीच रोज ४० ते ५० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. कांद्याला प्रति क्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत प्रति क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांच्या फरकाने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...