परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरी ८० पर्जन्य दिन

परभणी जिल्ह्याची पर्जन्य दिनाची (रेनी डेज) संख्या सरासरी ४९.८ आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात सरासरी ८० पर्जन्य दिनाची नोंद झाली आहे. गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत यंदाचा पर्जन्य दिन संख्येचा उच्चांक आहे. यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ९४० मिलिमीटर (११२.१४ टक्के) पाऊस झाला.
An average of 80 rainy days in this year's monsoon in Parbhani district
An average of 80 rainy days in this year's monsoon in Parbhani district

परभणी ः परभणी जिल्ह्याची पर्जन्य दिनाची (रेनी डेज) संख्या सरासरी ४९.८ आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात सरासरी ८० पर्जन्य दिनाची नोंद झाली आहे. गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत यंदाचा पर्जन्य दिन संख्येचा उच्चांक आहे. यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ९४० मिलिमीटर (११२.१४ टक्के) पाऊस झाला.

जिल्ह्यातील एकूण ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, त्यापैकी १० मंडळांमध्ये अतिवृष्टीची पुनरावृत्ती झाली. जिल्ह्यात गतवर्षी (२०१९) पर्यंत जून ते ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी ७७४.५ मिलिमीटर होती. यंदाच्या मे महिन्यातील शासन निर्णयानुसार वार्षिक सरासरीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९०३.३० मिलिमीटर, तर जून ते ऑक्टोबर या कालावधीतील (मोसमी पाऊस) सरासरी ८३९ मिलिमीटर आहे. यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत ९४०.९ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ११२.१४ टक्के पाऊस झाला.

दिवसभरातील २४ तासांमध्ये किमान २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, त्या दिवसाला पर्जन्य दिन म्हटले जाते. जिल्ह्यात २००८ ते २०१९ या १२ वर्षाच्या कालावधीत पर्जन्य दिन संख्या सरासरी २६ ते ७६ एवढी राहिली आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ७६, तर सन २०१४ मध्ये सर्वांत कमी २६ पर्जन्य दिनांची नोंद झाली होती.

गेल्या बारा वर्षांतील सरासरीवरून जिल्ह्यातील पर्जन्य दिनांची संख्या सरासरी ४९.८ निश्‍चित करण्यात आली. यंदा प्रत्यक्षात ८० पर्जन्य दिनांची नोंद झाली आहे. त्यात जून महिन्याची सरासरी ९.६ असताना प्रत्यक्षात १६ पर्जन्य दिन, जुलै महिन्याची  सरासरी १२.६ असताना प्रत्यक्षात २०, ऑगस्ट महिन्याची सरासरी ११.८ असताना प्रत्यक्षात १७, सप्टेंबर महिन्याची सरासरी ११.२ असताना प्रत्यक्षात १९, ऑक्टोबर  महिन्याची सरासरी ४.६ असताना प्रत्यक्षात ८ पर्जन्य दिनाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये ९ मंडळांमध्ये, ऑगस्ट महिन्यात १ मंडळात, सप्टेंबर महिन्यात १० मंडळांमध्ये,  ऑक्टोबर महिन्यात ८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 १० मंडळांत अनेक वेळा अतिवृष्टी जिल्ह्यात गतवर्षी पर्यंत ३९ महसूल मंडळांमध्ये पावसाची नोंद घेतली जात होती. यंदापासून नव्याने अस्तित्वात आलेल्या १२ महसूल मंडळांतील नोंद घेतली जात असल्याने आता एकूण महसूल मंडळाची संख्या ५१ झाली आहे. यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यापैकी १० मंडळांमध्ये अनेक वेळा अतिवृष्टी झाली. त्यात परभणी, सिंगणापूर, सावंगी म्हाळसा, मानवत, पाथरी, हदगाव, पालम,  पूर्णा, चुडावा आदी मंडळांचा समावेश आहे. जून महिन्यात ८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com