Agriculture news in Marathi Average to below average temperature forecast | Page 2 ||| Agrowon

सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतल्यानंतर राज्याच्या तापमान चढ-उतार होत आहेत. स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे दुपारी उन्हाचा चटका वाढून ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव आहे. तर किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा जाणवत आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतल्यानंतर राज्याच्या तापमान चढ-उतार होत आहेत. स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे दुपारी उन्हाचा चटका वाढून ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव आहे. तर किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. २२ ते २८ ऑक्टोबर या आठवड्याच्या कालावधीत कमाल आणि किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा माघारी परतल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. १४ ते २० ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची उघडीप होती. तर उर्वरित राज्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. 

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत कमाल तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ त ४ अंश, तर उर्वरित राज्यात २ अंशांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंशांपर्यंत अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

राज्यात थंडीची चाहूल लागली असून, पहाटे गारठा जाणवत आहे. किमान तापमानाचा विचार करता २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात किमान तापमान सरासरी पेक्षा ० ते २ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमान ० ते २ अंशांनी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...