Agriculture news in marathi, On average, five percent rainfall in five districts | Agrowon

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत सरासरी ८१ टक्के पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ५९ दिवसच पाऊस झाला. या पाच जिल्ह्यांत यंदा सरासरीच्या ८१ टक्‍के पाऊस झाला, अशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. 

गतवर्षी याच कालावधीत पावसाचे सरासरी केवळ ३३ दिवस असताना सरासरीच्या ८४ टक्‍के पाऊस झाला होता. यंदा लातूरमध्ये सर्वांत कमी दिवस, तर उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सर्वांत कमी पाऊस झाला. 

उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ५९ दिवसच पाऊस झाला. या पाच जिल्ह्यांत यंदा सरासरीच्या ८१ टक्‍के पाऊस झाला, अशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. 

गतवर्षी याच कालावधीत पावसाचे सरासरी केवळ ३३ दिवस असताना सरासरीच्या ८४ टक्‍के पाऊस झाला होता. यंदा लातूरमध्ये सर्वांत कमी दिवस, तर उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सर्वांत कमी पाऊस झाला. 

गतवर्षीच्या खरिपातील दुष्काळानंतर निदान यंदा तरी पावसाची कृपा राहील अशी आशा होती. परंतु, यंदाही खरिपाच्या पिकाबाबतीत आपली अवकृपाच दाखविण्याचे काम लहरी पावसाने केले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान या पाच जिल्ह्यांतील नोंदल्या गेलेल्या पावसाने आपला लहरीपणा स्पष्ट केला. या जिल्ह्यांत सरासरी ७७४.४० मिलिमिटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात ६२९.०५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

पाचही जिल्ह्यात जून महिन्यात सर्वांत कमी सरासरी ८९.८०, जुलैमध्ये १५६.७०, ऑगस्टमध्ये १५८.१५, तर सप्टेंबरमध्ये सरासरी २१३.२६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी ७३१.४४ मिलिमिटर असते. यंदा या चार महिन्यांत सरासरीच्या ७१ टक्‍के म्हणजे ५१८.६६ मिलिमिटरच पावसाची नोंद झाली आहे. शिवाय पाचही जिल्ह्यांपैकी केवळ ५४ दिवसच चार महिन्यांत पावसाचे राहिले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्याची ६८१.८० पैकी ४५३.७८ मिलिमिटर म्हणजे सरासरीच्या केवळ ६७ टक्‍केच पाऊस झाला. शाश्‍वत पाण्याच्या भागात येणाऱ्या नांदेड, परभणी व हिंगोली या तीनही जिल्ह्यांवर पावसाची अवकृपाच राहिली आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी ८८८.७९ मिलिमिटरच्या तुलनेत ८२१.५० मिलिमिटर अर्थात सरासरीच्या ९२ टक्‍के पाऊस झाला. चार महिन्यांत पावसाचे दिवस केवळ ६१ राहिले आहेत. परभणी जिल्ह्यात ७२७.०२ पैकी सप्टेंबर अखेरपर्यंत  सरासरीच्या ८२ टक्‍के म्हणजे ५९९.४८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. हा पाऊसही चार महिन्यांतील ६१ दिवसांतच नोंदला गेला. हिंगोली जिल्ह्यात चार महिन्यांत सरासरी ८४२.९४ मिलिमिटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात  ७५१.८५ मिलिमिटर सरासरीच्या ८९ टक्‍के पाऊस नोंदला गेला.

गतवर्षी केवळ ३३ दिवसच पाऊस  

जून ते सप्टेंबर या कालावधीत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांत केवळ ३३ दिवस पाऊस सरासरीच्या ८४.६९ टक्‍केच झाला होता. गतवर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी २७ दिवस, लातूर व परभणीमध्ये प्रत्येकी २९ दिवस, तर नांदेडमध्ये ४० दिवस व हिंगोलीत ३९ दिवसच पाऊस झाला होता. यंदाही प्रत्यक्षात गतवर्षीच्या सरासरी पावसाच्या टक्‍क्‍याच्या तुलनेत कमीच आहे.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...