सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल

सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल
सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल

सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

खपली गव्हाची २२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १८०० ते १९५० तर सरासरी १८७५ रुपये असा दर मिळाला. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक २२१६ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १००० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची आवक २६९५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते १९०० तर सरासरी १६०० रुपये असा दर होता.

डाळिंबाची १०२८० डझनाची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १०० ते ६०० तर सरासरी ३०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ६९१ पेटीची आवक झाली असून त्यास प्रति पेटीस १५०० ते २५०० तर सरासरी १८०० रुपये असा दर मिळाला. शिवाजी मंडईत भाजी पाल्याची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. भेंडीची ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रूपये असा दर मिळाला.

वांग्याची ६० ते ७० बॉक्सची आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस ५०० ते ७०० रुपये असा दर होता. गवारची आवक कमी आहे. त्यामुळे गवार तेजीत आहे. गवारची २०० ते ३०० किलोची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ८०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.

सां. कृ. उ. बाजार समितीत मंगळवारी (ता. २१) आवक शेतीमाल व दर (क्विंटलमध्ये)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मटकी ९० ५५०० ७५०० ६५००
ज्वारी(शाळू) १५१ २४५० ३००० २७२५
गहू १०८ २००० २८०० २४२५
तांदूळ ३५० २००० ६५०० ४२५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com