औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात रब्बी पेरणीची सरासरी ओलांडली

average rabbi sowing exceeded in Aurangabad, Jalna and Beed district
average rabbi sowing exceeded in Aurangabad, Jalna and Beed district

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे मिळून सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक रब्बीची पेरणी झाली आहे. या तीनही जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ८ लाख ४७ हजार हेक्‍टरवर परेणी झाली आहे. 

पेरणी झालेल्या क्षेत्रात तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक पेरणी केली. तरीही इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीला प्रथम प्राधान्य दिले आहे. तीनही जिल्ह्यांत ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ८८ हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ६८ टक्‍के म्हणजे ३ लाख ३२ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली.त्यापाठोपाठ सर्वसाधारण १ लाख ५९ हजार हेक्‍टरच्या तुलनेत २ लाख ७७ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली.  

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार हेक्‍टर असताना प्रत्यक्षात १ लाख ८२ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४६ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ४९ हजार ८३२ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ४९३१ हेक्‍टर, तर प्रत्यक्षात केवळ ७८५ हेक्‍टरवरच करडईची पेरणी झाली. 

तृणधान्याची ५ लाख ६८ हजार हेक्‍टरवर, कडधान्याची २ लाख ७७ हजार हेक्‍टरवर, तर गळीतधान्याची १२९९ हेक्‍टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. ती वगळता औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

एकूण पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

औरंगाबाद  २ लाख २८ हजार 
जालना २ लाख ७४ हजार
बीड ३ लाख ४४ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com