अमरावती विभागात सरासरीच्या ९२ टक्‍के पाऊस 

अमरावती विभागात सरासरीच्या ९२ टक्‍के पाऊस 
अमरावती विभागात सरासरीच्या ९२ टक्‍के पाऊस 

अमरावती ः विभागात गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकऱ्यांसाठी पीक व्यवस्थापनही जिकिरीचे ठरत आहे. पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच कीड-रोगाचेही आक्रमण झाल्याने कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढीस लागली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या ८९.८ टक्‍के पावसाच्या तुलनेत गुरुवार (ता. २६) पर्यंत ९२.५ टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. 

जूनच्या सुरवातीला एक-दोन दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली असताना त्यानंतर मात्र पावसाने पिकांची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र सर्वदूर अनुभवता येण्यासारखे आहे. पूर्व विदर्भात अमरावतीत १३.१, अकोला २३.५, यवतमाळ ६.१, बुलडाणा २६.६ तर वाशीम जिल्ह्यात ३२.९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतरही रिपरिप सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. लवकर परिपक्‍व होणारे सोयाबीन वाण लवकरच काढणीस येणार असताना त्याच्यावरही कीड-रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

त्यासोबतच उशिरा येणाऱ्या वाणांनीदेखील शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. ढगाळ वातावरण तसेच पावसाची रिपरिप अशी अनेक कारणे कीड-रोगाच्या प्रसारामागे दिली जात आहेत. कापसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नसल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे.

विभागात पाऊस समाधानकारक झाल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करताना योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करावा. - सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com