agriculture news in Marathi, average rate for banana from four months, Maharashtra | Agrowon

केळीला चार महिन्यांपासून चांगला दर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

केळीची जशी मागणी उत्तरेकडून कायम आहे. तशी कमी गुणवत्तेच्या केळीला मुंबई, कल्याण भागांतून मागणी आहे. सावदा येथून अलीकडे बॉक्‍समध्ये भरलेली केळी अधिक प्रमाणात उत्तरेकडे पाठविली जात आहे. 
- सुधाकर चव्हाण, केळी व्यवसायातले जाणकार

जळगाव ः जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मागील चार महिन्यांपासून केळीचे बऱ्यापैकी दर मिळत असून, गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे निर्यातीलाही चालना मिळाली आहे. मागील चार महिने चांगल्या दर्जाच्या केळीला एक हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. उत्तरेकडील राज्यांमधून मागणी कायम असल्याने होळी व रंगाचा उत्सव असतानाही सावदा व चोपडा येथे केळीची खरेदी सुरूच आहे. 

होळी किंवा धूलिवंदनाचा उत्साह उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक असतो. या काळात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू येथून केळीची मागणी नसते. सावदा, चोपडा व पाचोरा भागांतील केळी खरेदीदारांना चार-पाच दिवस व्यवहार बंद ठेवावे लागत होते. परंतु यंदा मात्र अनेक वर्षांनंतर होळीच्या काळातही सावदा (ता. रावेर) व चोपडा येथील केळी व्यापाऱ्यांना केळीची कापणी व इतर व्यवहार सुरू ठेवावे लागले. 

केळी निर्यात देशांतर्गत बाजारपेठे मागील चार महिने कायम राहिली आहे. सावदा येथून जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल केळीची निर्यात उत्तरेकडील राज्यांमध्ये झाली. काही व्यापाऱ्यांना पश्‍चिम बंगाल व बिहारपर्यंत केळी पाठविण्याच्या ऑर्डरही मिळाल्या होत्या. सध्या आगाप नवती, पिलबाग यांची रावेर, चोपडा, पाचोरा, जामनेर भागांत कापणी सुरू झाली आहे.

जळगाव व यावलमधील कांदेबाग संपत आले असून, दर्जेदार केळीचा पुरवठा कमी झाला आहे. परंतु आगाप नवती रावेरातून सुरू झाल्याने तुटवड्याची समस्या मागील १० ते १२ दिवसांत दूर होण्यास मदत झाली आहे.

केळी खरेदी जोरात
रावेरनजीकच्या बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापाऱ्यांनी ऑन देऊन मुक्ताईनगर तालुक्‍यातील कर्की, दुई, अंतुर्ली, चांगदेव आदी तापीकाठालगतच्या भागातून केळीची खरेदी सुरूच ठेवली असून, सावदा व चोपडा, पाचोरा भागांतील व्यापाऱ्यांसमोर स्पर्धाही वाढली आहे. केळीचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी सावदा येथे भेट देऊन मध्यस्थांना आगाऊ रक्कम वितरणासाठी मदत केल्याची माहिती मिळाली. चोपडा येथील सुमारे १२ केळी व्यापाऱ्यांकडून शिरपूर, शिंदखेडा (जि. धुळे) भागातूनही केळीची खरेदी सुरू झाली आहे. सध्या मुबलक व अधिक गुणवत्तापूर्ण केळी रावेर, यावल व चोपडा भागात अधिक आहे. पाचोरा तालुक्‍यातही चांगली केळी असून, व्यापाऱ्यांनी केळी उत्पादकांकडे आगाऊ नोंदणीही करून ठेवली आहे, असे सांगण्यात आले. 

प्रतिक्रिया
यंदा केळीचे दर पाच सहा महिने स्थिर आहेत. पाच सहा वर्षांपूर्वी १४०० रुपयांपर्यंत दर गेले होते. पण त्यात मोठी घसरणही झाली होती. मागील पाच-सहा महिने असे काहीच झाले नाही. स्थिर दरांचा लाभ केळी उत्पादकांना चांगला होत आहे. जळगाव जिल्ह्यात एक हजार रुपये प्रतिक्विंटल व ऑन, असे चांगले दर मिळत आहेत. बऱ्हाणपूरचे दर काही वेळेस १२०० रुपयांवर असतात. 
- विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर (ता. रावेर, जि. जळगाव)

 

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...