Agriculture news in marathi Average sowing of wheat in Nagar district is 31percent | Agrowon

नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के गव्हाची पेरणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, अद्याप जिल्हाभरात ३१ टक्केच गव्हाची पेरणी झाली आहे. यावर्षी पाणी उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्ती वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यामध्ये रब्बीत ६ लाख ६७ हजार २६१ हेक्टर पेरणीचे सरासरी आहे. ज्वारी, हरभरा, गहू, मकांचे क्षेत्र अधिक असते. जिल्ह्यामध्ये गव्हाचे सरासरी ४९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे.

नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, अद्याप जिल्हाभरात ३१ टक्केच गव्हाची पेरणी झाली आहे. यावर्षी पाणी उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्ती वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यामध्ये रब्बीत ६ लाख ६७ हजार २६१ हेक्टर पेरणीचे सरासरी आहे. ज्वारी, हरभरा, गहू, मकांचे क्षेत्र अधिक असते. जिल्ह्यामध्ये गव्हाचे सरासरी ४९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ होऊन सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. मात्र अद्याप तरी गव्हाच्या पेरणीला फारसा वेग नसल्याचे चित्र आहे.

आधीच पुरेसा पाऊस नसल्याने कापसाची वाढ खुटंली. त्यात मागील महिन्यात झालेल्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापसाची आता शेवटी वेचनी चालू आहे. ज्या भागात मागील महिन्यात झालेल्या पावसाने पाणी उपलब्ध झाले, त्या भागात आता ज्वारी पेरणी शक्य नाही. त्यामुळे तेथे गव्हाचा पेरा वाढणार आहे.

सध्या जिल्हाभरात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के म्हणजे १५ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. श्रीगोंदा, पारनेर तालुक्यांत सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली असून कर्जत, राहुरी, अकोल्यात गव्हाचे क्षेत्र अल्प आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांत तर गव्हाची पेरणीच झाली नाही ,असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.


इतर बातम्या
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...