Agriculture news in marathi Avoid allocation of sugar from ration shopkeepers | Agrowon

रेशन दुकानदारांकडून साखर वाटपास टाळाटाळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 मार्च 2020

जळगाव  : रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना धान्यच देण्यात येत असून त्यातील साखरच गायब होत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पाहणीत दिसून आला. 

जळगाव  : रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना धान्यच देण्यात येत असून त्यातील साखरच गायब होत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पाहणीत दिसून आला. 

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कार्डधारकांची बायोमॅट्रिक पद्धतीने थम घेऊन त्यानंतरच धान्याचे वितरण केले जाते. संपूर्ण जिल्हाभरात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अंत्योदय कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ यासह शासनाकडून साखरेचादेखील पुरवठा केलेला आहे. परंतु रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना केवळ धान्याचा पुरवठा केला जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. तसेच पुढील काही महिन्यात ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, सप्लाय इन्सपेक्‍टर यांचा अहवाल आल्यानंतरच रेशन दुकानदारांना धान्याचे वाटप करण्याबाबत त्यांचे नियोजन सुरू आहे. 

‘‘जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अडावद- ३, चोपडा-६, वटार- १, रावेर-५, पारोळा-७ अशा एकूण २२ ठिकाणी रेशन दुकानांची तपासणी केली. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा पुरवठाच केला जात नसल्याचे पाहणीत समोर आले आहे. तसेच वटार येथे अनेक महिन्यांपासून धान्य वाटपच नसल्याने परवाना रद्दच करणार,’’ असल्याचे पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिली. 

रावेर तालुक्‍यातील अंत्योदय जो कार्डधारक धान्य घेण्यासाठी आला. त्यालाच आपल्या इच्छेनुसार धान्याचे वाटप केले जाते, तर अनेक तालुक्‍यांमध्ये रेशन दुकानदारांकडून धान्याचे वाटपच केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

... तर तीन महिने परवाना निलंबित करणार 
रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना धान्याचे वितरण अंत्यत अल्प प्रमाणात केले जात असल्याचे समोर आले आहे. ज्या रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना धान्य वाटपात कसूर केला जात आहे. अशा रेशनदुकानदारांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...