Agriculture news in marathi, Avoid compensation to Waghur project victims | Agrowon

जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यास टाळाटाळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५ मध्ये जामनेर तालुक्यातील चिंचखेडा, केकतनिंभोरा व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी, गावठाण जागेचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी केले. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिलेला नाही.

शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५ मध्ये जामनेर तालुक्यातील चिंचखेडा, केकतनिंभोरा व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी, गावठाण जागेचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी केले. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिलेला नाही.

औरंगाबाद खंडपीठाने आठ आठवड्यांत ७५ टक्के रक्कम देण्याचे आदेश दिले. तरीही महामंडळाने शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही. या सर्व प्रतिवादींविरुद्ध जंगम वॉरंटमध्ये पहिल्या टप्प्यात वाघूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे चारचाकी शासकीय वाहन व संगणक बेलिफ ताडे यांच्यासमक्ष जप्त करण्यात आले. 

या बाबत शेतकरी चिंतामण भोंडे (वय ७९), एकनाथ पाटील (६९, रा. केकतनिंभोरा, ता. जामनेर) यांनी जळगाव न्यायालयात दरखास्त दाखल केली आहे. यात न्यायालयाच्या आदेशानुसार, ही जप्तीची कारवाई करण्यात आली. आता जिल्हाधिकारी, जिल्हा भूसंपादन अधिकारी, अप्पर तापी प्रकल्प हतनूर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी संचालक तापी खोरे विकास महामंडळ जळगाव यांच्याविरोधातही न्यायालयाने जप्ती वॉरंट जारी केले आहे. त्यांची वाहने व इतर सामानाची लवकरच जप्ती होणार आहे.

१५ वर्षांपासून शासकीय कामासाठी गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा, ही अपेक्षा गरीब शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित अधिकाऱ्यांविरोधात लवकरच जप्तीचे वॉरंट बजावले जाणार असल्याची माहिती या शेतकऱ्यांचे वकील ॲड. देवेंद्र पारूळकर व ॲड. कमलाकर बारी यांनी दिली.


इतर बातम्या
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
साडेपाच लाख टन सोयापेंड  आयातीसाठी...पुणे ः केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम...
तुरीच्या पिकाकडून तूट भरून निघण्याची आशासाखरखेर्डा, जि. बुलडाणा ः यंदा या परिसरात तुरीचे...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
मालेगाव बाजार समितीत बेकायदा अडत वसुली...नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर...सिंधुदुर्गनगरी ः कोरोनाचा प्रादुर्भाव आणि...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांने...जळगाव : जळगाव जिल्ह्यात यावर्षी पंधरा तालुक्यातील...