agriculture news in marathi Avoid crop loan disbursement in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपास टाळाटाळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

सांगली ः खरीप हंगामामध्ये जिल्हा बॅंक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बॅंकांना पीक कर्जवाटपाचे १ हजार ४९७ कोटी ५० लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी  १ हजार ३८७ कोटी २५ लाखाचे कर्जवाटप केले आहे.

सांगली ः खरीप हंगामामध्ये जिल्हा बॅंक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बॅंकांना पीक कर्जवाटपाचे १ हजार ४९७ कोटी ५० लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी  १ हजार ३८७ कोटी २५ लाखाचे कर्जवाटप केले आहे.

 जिल्हा बॅंकेने एक लाख ४५ हजार १७९ शेतकऱ्यांना ९१६ कोटी २८ लाख रुपयांचे सर्वाधिक कर्जवाटप केले.  रब्बी हंगामासाठी जिल्हा बॅंकेकडून कर्जवाटप सुरु झाले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बॅंकांकडून पीक कर्जवाटपास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे.

शासनाने खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बॅंकाना एक हजार ४९७ कोटी ५० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला एप्रिल महिन्यापासून सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधित या तीनीही बॅंकांनी ३०  सप्टेंबर २०२० पर्यंत ९३ टक्के कर्जाचे वाटप केले.

जिल्हा बॅंकेला ८०० कोटी ५० लाख कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी एक लाख ४५ हजार १७९ शेतकऱ्यांना ९१६ कोटी २८ लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. इतर बॅंकांना ६९७ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी या बॅंकांनी २४ हजार ८०५ शेतकऱ्यांना ४७१ कोटी दोन लाख पीक कर्जाचा पुरवठा केला आहे.  राष्ट्रीयीकृत बॅंकांना ठरवून दिलेल्या पीक कर्जाच्या ६८ टक्केच पीक कर्जवाटप केले आहे.

शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करू लागले आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा एक ऑक्टोबरपासून करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा बॅंकेने रब्बी हंगामाच्या कर्ज वाटपास सुरवात केली आहे. मात्र,  राष्ट्रीयीकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपास अद्यापही सुरु केलेले नसल्याचे चित्र आहे.


इतर बातम्या
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...