मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
कार्तिकी वारी कालावधीत गर्दी टाळा : जिल्हाधिकारी शंभरकर
सोलापूर : ‘‘कार्तिकी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात या कालावधीत गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी’’, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
सोलापूर : ‘‘कार्तिकी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कालावधीत गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी’’, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
कार्तिक वारी नियोजनाबाबत पंढरपुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, उदयसिंह भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस उपअधिक्षक दत्तात्रेय पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षका डॉ. जयश्री ढवळे उपस्थित होते.
शंभरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या वारी कालावधीत चंद्रभागा स्नान करुन कळसाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येतात. यासाठी २१ नोव्हेबर ते १ डिसेंबर २०२० पर्यंत चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. खाजगीवाले यांच्या रथोत्सावाची मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरुन साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करून काढण्यात येईल, याकडे लक्ष द्या.’’
‘‘आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. सातपुते यांनी पोलिसबंदोबस्ताची माहिती दिली.
सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी
पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंगळवारी (ता.२४) रात्री १२ वाजेपासून ते गुरुवारी (ता.२६) रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहर व शहरालगतच्या ११ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत, यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे, विनाकारण कोणीही या कालावधीत फिरू नये, असेही शंभरकर म्हणाले.
- 1 of 1022
- ››