झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस टाळाटाळ

घरातील वीजजोडणीसाठी मार्च २०१५ मध्ये कोटेशन भरले. तेव्हापासून महावितरणकडे हेलपाटे मारत आहे. चार वर्षांत खांब तेवढे आणून टाकले आहेत. अजून वीजजोडणी मिळालेली नाही. - हरिबा वाघमोडे सध्या शेतीपंपाची वीजजोडणी सुरू आहे. ती झाल्यानंतर घरगुती वीजजोडणी करणार आहे. - विष्णू मंडले, कनिष्ठ अभियंता
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस टाळाटाळ
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस टाळाटाळ

झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व शेतीपंपांचे वीजजोड पाच ते सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. शेतीपंप व घरगुती वीजजोडणीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जोड वेळेत मिळत नाहीत.

महावितरणकडे हेलपाटे मारून शेतकरी त्रस्त आहेत.   विभूतवाडी (ता. आटपाडी) येथील बयाबाई वाघमोडे यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले. घराचे काम पूर्ण झाले. त्यांनी विजेसाठी मागणी अर्ज महावितरणकडे दिला. मार्च २०१५ मध्ये ५७० रुपयांचे कोटेशन भरले. तेव्हापासून वाघमोडे महावितरणकडे हेलपाटे मारत आहेत. त्यांना अजून वीजजोड मिळालेले नाही. वीजजोड वेळेत मिळत नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच शेतीपंपांचे मीटर बिघडले आहेत. ते बदलून देण्यास महावितरण टाळाटाळ करीत आहे. मीटर बिघडल्याने बिले भरमसाट येत आहेत. 

आठ-दहा वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. विहिरी, तलावांत पाणीच नाही, मोटारी बंदच आहेत. तरीही अंदाजे बिल येतच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण भुर्दंड बसत आहे. महावितरणकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळा  मागणी करूनसुद्धा मीटर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सध्या अनेक शेतीपंप व घरगुती वापराच्या वीजजोडणीसाठी ठेकेदाराने केवळ खांब आणून टाकले आहेत. घरगुती वीजजोडणी व शेतीपंपांच्या विजेसाठी शेतकरी महावितरणकडे हेलपाटे मारून थकले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com