Agriculture news in marathi, Avoid disconnection of electricity from MahaViran in the Zare area | Agrowon

झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस टाळाटाळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

घरातील वीजजोडणीसाठी मार्च २०१५ मध्ये कोटेशन भरले. तेव्हापासून महावितरणकडे हेलपाटे मारत आहे. चार वर्षांत खांब तेवढे आणून टाकले आहेत. अजून वीजजोडणी मिळालेली नाही. 
- हरिबा वाघमोडे 

सध्या शेतीपंपाची वीजजोडणी सुरू आहे. ती झाल्यानंतर घरगुती वीजजोडणी करणार आहे. 
- विष्णू मंडले, कनिष्ठ अभियंता

झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व शेतीपंपांचे वीजजोड पाच ते सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. शेतीपंप व घरगुती वीजजोडणीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जोड वेळेत मिळत नाहीत.

महावितरणकडे हेलपाटे मारून शेतकरी त्रस्त आहेत. 
 विभूतवाडी (ता. आटपाडी) येथील बयाबाई वाघमोडे यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले. घराचे काम पूर्ण झाले. त्यांनी विजेसाठी मागणी अर्ज महावितरणकडे दिला. मार्च २०१५ मध्ये ५७० रुपयांचे कोटेशन भरले. तेव्हापासून वाघमोडे महावितरणकडे हेलपाटे मारत आहेत. त्यांना अजून वीजजोड मिळालेले नाही. वीजजोड वेळेत मिळत नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच शेतीपंपांचे मीटर बिघडले आहेत. ते बदलून देण्यास महावितरण टाळाटाळ करीत आहे. मीटर बिघडल्याने बिले भरमसाट येत आहेत. 

आठ-दहा वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. विहिरी, तलावांत पाणीच नाही, मोटारी बंदच आहेत. तरीही अंदाजे बिल येतच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण भुर्दंड बसत आहे. महावितरणकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळा 
मागणी करूनसुद्धा मीटर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सध्या अनेक शेतीपंप व घरगुती वापराच्या वीजजोडणीसाठी ठेकेदाराने केवळ खांब आणून टाकले आहेत. घरगुती वीजजोडणी व शेतीपंपांच्या विजेसाठी शेतकरी महावितरणकडे हेलपाटे मारून थकले आहेत.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...